नाशिक- मनपा आयुक्त कैलास जाधवांची जागा घेणार रमेश पवार; म्हाडा घोटाळाप्रकरणी असहकार्य भोवले?

0
20

द पॉईंट नाऊ ब्युरो : नाशिक महापालिकेचे आयुक्त कैलास जाधव यांची जागा आता रमेश पवार घेणार आहेत. याबाबत राज्य शासनाने नुकतेच आदेश दिले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, मुंबई महापालिकेत सहआयुक्त म्हणून कार्यरत असलेले रमेश पवार यांना तात्काळ नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदाचा कारभार आपल्या हाती घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र कैलास जाधव यांबाबत अद्याप काहीही निर्णय झालेला नसल्याचे सांगण्यात येत आहे.

नाशिक शहरात म्हाडाला घरे हस्तांतरित करण्यात घोटाळा झाल्याचे आरोप करण्यात आले. मात्र त्याबाबत कैलास जाधव यांनी शासनाला योग्य ती माहिती दिली नसल्याचे सांगण्यात येत असून, याच कारणास्तव ही बाब गंभीर असल्याचे म्हणत विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी कैलास जाधव यांची बदली करण्याचे आदेश दिले होते.

त्या अनुषंगाने आता नाशिक महापालिका आयुक्त पदाची सूत्रे रमेश पवार हे घेणार आहेत. मात्र कैलास जाधव यांच्या नियुक्तीबाबत निर्णय टांगणीलाच आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here