नाशिक मध्ये खुनाचे सत्र सुरूच ; नागरिक धास्तावले

0
45

नाशिक प्रतिनिधी : नाशिक सद्या अशांत असल्याचे चित्र आहे गेल्या वर्ष भरापासून खुनाचे सत्र सुरू असून म्हसरूळच्या खुनाची (Mhasrul Murder) घटना ताजी असतानाच सलग दुसऱ्या दिवशी पौर्णिमा बस स्टॉपमध्ये पुण्याच्या एका व्यक्तीचा मृतदेह ठेचलेल्या अवस्थेत आढळून आल्याने नाशकात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पहाटे चार वाजेच्या सुमारास टोळक्याने नाशिक रोडकडे जाणाऱ्या रस्त्यावर पौर्णिमा बस स्टॉप समोरच भास्कर पाटील (४४,रा. फ्लॅट नंबर 10, सुयश सहकारी संस्था, पश्चिमरंग सोसायटी जवळ, युनिव्हर्सल हाऊस जवळ, वारज जकात नाका पुणे) यांचा मृतदेह आढळून आला.

घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त संजय बारकुंड, सहाय्यक आयुक्त दीपाली खन्ना, सरकारवाडा पोलीस ठाण्याचे वपोनी साजन सोनवणे, पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर आदींच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली असता मयत पाटील यांना दगडाच्या सहाह्याने मारले असल्याचे प्रथम दर्शनी लक्षात आले. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले असून भद्रकाली पोलीस पुढील तपास करीत आहेत.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here