नाशिक मध्ये खुनाचे सत्र सुरूच ; डोक्यात दगड घालून क्रूरपणे हत्या

0
52

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : नाशिक शहरात खुनाचे स्तर सुरूच असून, गेल्या तीन महिन्यापासून हे सत्र चालू असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पहाटे डोक्यात दगड घालून एकाची क्रूरपणे हत्या केल्याची घटना आज नाशिकमध्ये घडली. पहाटे तीनच्या सुमारास ही घटना घडली असून पूर्ववैमनस्यातून हा प्रकार घडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

नाशिक मधील अनिल गायधनी असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. गरीब कुटुंबातील या व्यक्तीची हत्या पूर्वीच्या भांडणातून झाल्याचा अंदाज आहे. हा व्यक्ती हॉटेलमध्ये आचारी म्हणून काम करत होता. तीन महिन्यांपूर्वीच त्याने येथील एका हॉटेलमध्ये कामाला सुरुवात केली होती. यामुळे नाशिक मध्ये खळबळ उडाली आहे.

ही घटना आज पहाटेच्या सुमारास घडली, रामसेतू पूल परिसरातील राजहंस दुकानाजवळ त्याचा मृतदेह आढळून आला आहे.

यानंतर नाशिक पोलिसांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपासकार्य सुरू केले आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

दरम्यान, परिसरातील दुकानांचे सीसीटीव्ही फुटेज तपासून पोलिसांनी शुभम मोरे नामक एक संशयितास ताब्यात घेतले आहे. संशयित शुभम याच्या वडिलांचा भेळ भत्याचा व्यवसाय असल्याचे समजते. भांडणातून हा प्रकार घडला असावा असा अंदाज पोलीस सूत्रांनी व्यक्त केला आहे. अधिक तपास नाशिक पोलीस करत आहेत.

आज पहाटे तीनच्या सुमारास ही घटना घडल्याचे पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांना समजले. यानंतर काही वेळातच पोलीस अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. परिसराचा ताबा घेऊन तपासकार्य सुरू केले. यानंतर काही वेळेतच संशयित ताब्यात घेण्यात आला. या कारवाई दरम्यान पोलीस उपायुक्त अमोल तांबे, सहायक पोलिस आयुक्त श्रीमती खन्ना यांच्यासह अनेक अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

अधिक तपास पोलीस करत असून मुख्यसूत्रधार लवकरच सापडेल अशी आशा आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here