द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : नाशिक शहर पुन्हा एकदा खुनाने हादरले आहे. चहा ,वडापाव स्वस्त दरात का विकतो या क्षुल्लक कारणावरून चहा विक्रेतेवर प्राणघातक हल्ला करण्यात आला या हल्ल्यात तुषार काळे याचा मुत्यु झाला आहे. याबाबत म्हसरूळ पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे
नाशिकच्या म्हसरूळ परिसरातील आर टी ओ रासबिहारी लिंक रोड वरील काळसकर नगर येथे हा प्रकार घडला आहे. दोघे टपरीधारक समोरा समोर चहाच्या टपरी विक्रेत्यांमध्ये पाव वडा आणि चहा कमी दराने का विकतो आणि माझी मदानामी का करतो या कारणावरून वाद होऊन संशहित आकाश काळे याने तुषार काळेवर प्राण घातक हल्ला केला होता या हल्ल्यात तुषार गंभीर जखमी झाल्याने त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले मात्र त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला यावर नाशिक येथील म्हसरूळ पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपी आकाश काळे यास अवख्या 3 तासात म्हसरूळ पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळत त्याला अटक केली आहे.
छोट्या कारणावरून एका चहा विक्रेत्याने दुसऱ्या चहा विक्रेत्यांवर हल्ला करून हत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे . गेल्या काही दिवसांपूर्वी सोनाली मटण हॉटेलमध्ये देखील खून झाला होता. यामुळे नाशिक मध्ये सध्या कायद्याचा धाक आहे का हा प्रश्न उपस्थित राहतो.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम