नाशिक प्रतिनिधी : नाशिक येथे जेलरोड मध्ये असलेल्या करन्सी नोट प्रेस च्या पाठीमागे आग लागल्याने तारांबळ उडाली, प्रेसच्या बाजूस असलेल्या या भीषण आगीने परिसरात आज खळबळ उडाली. यापूर्वीदेखील उन्हाळ्यात आग लागल्याच्या घटना घडलेल्या असल्याने हे अति उष्णनेतेने पेट घेत असल्याचे निदर्शनास आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आग लागली तिथे मोठ्या प्रमाणात अस्वच्छता असल्याने गवत व कचऱ्याचे साम्राज्य होते. उन्हाची तीव्रता अधिक असल्यामुळे ही आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
आगीत परिसरातील गवत मोठ्या प्रमाणात जळाले आहे. मात्र, ही आग लागली की लावली गेली याबाबत उच्चस्तरीय चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे, आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरू असून अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहचल्या आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम