नाशिक – तो पुन्हा आला, त्याने पाहिलं आणि…

0
23

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी (नाशिक) : नाशिक शहरात पुन्हा एकदा बिबट्याचे दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं. शहरात नाशिक रोड परिसरात जय भवानी रोड येथे हा बिबट्या आढळून आला. या परिसरात आढळलेला हा बिबट्या CCTV कॅमेऱ्यात कैद झाला.

झाडांची जंगले तोडून सिमेंटची जंगले उभे करण्याचे परिणाम नाशिककरांना वारंवार दिसून येत आहेत. अजूनही शहराच्या आजूबाजूला जंगलाचा भाग आहे. बिबट्यांना खाण्या-पिण्याची होत असलेली वाणवा वारंवार नाशिककरांना तो जाणवून देऊ लागला आहे.

आजपर्यंत नाशिक शहरात जवळपास प्रत्येक भागात बिबट्या एक प्रकारे रपेट मारून गेला आहे. गंगापूर रोड वरील सावरकर नगर भागातील बिबट्याचा थरार नाशिककर अजून विसरलेले असतील न असतील तोच त्याने पुन्हा एकदा आपला अधिवास दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

दरम्यान, वनविभागाच्या बऱ्याच प्रयत्नानंतर अखेर या नाशिकरोड परिसरात आढळलेल्या बिबट्याला पकडण्यात वनविभागाला यश आले आहे.

मात्र अशा प्रकारे कधीपर्यंत हा बिबट्या असाच दर्शन देत राहणार, कधीपर्यंत असेच त्याला वनविभाग पकडून नैसर्गिक अधिवासात सोडणार हा देखील प्रश्न निरुत्तरीत आहे.

कारण बिबट्याने नव्हे तर माणसाने बिबट्याच्या अधिवासावर अतिक्रमण केलेले आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here