ब्रेकिंग न्यूज
नाशिक प्रतिनिधी : भ्रष्टाचाराची लागलेली कीड काही संपता संपेना. नाशिक शहरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून आज एका महिला अधिकारीला लाच घेतांनारंगेहाथ पकडल्याची घटना समोर येतेय. या संदर्भात ठाणे पथकाने कारवाई करण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळतेय मात्र ही महिला अधिकारी कोण याची उत्सुकता लागली आहे. लवकरच अधिकृत माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
ही घटना आज सायंकाळी घडली , आज ही कारवाई करण्यात आली आहे. ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून या कारवाईला दुजोरा देण्यात आला आहे. शिक्षण विभागाच्या अधिकारी पदावर असलेल्या एका अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. याबाबत अधिक माहिती आमचे प्रतिनिधी घेत आहेत.
आज ही घटना समोर आल्याने अधिकारी वर्गात खळबळ उडाली आहे. तक्रारदाराकडून किती रकमेची मागणी झाली होती. तसेच कुठल्या कारणासाठी रक्कम मागण्यात आली होती. तसेच सापळयाबाबतची माहिती अद्याप प्राप्त होऊ शकलेली नाही. सविस्तर बातमी आम्ही लवकरच आपल्या पर्यंत पोहचवू.
सविस्तर बातमींसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या लवकर सविस्तर माहिती वेबसाईटवर असेल…..
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम