द पॉईंट नाऊ प्रतिनिधी (नाशिक) : नाशिक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी गंगाधरण डी. यांनी आज (31 मार्च) रोजी भारतीय स्टेट बँकेसह शासकीय व्यवहार सांभाळणाऱ्या बँकांना रात्री 12 वाजेपर्यंत बँक5 सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
आज वित्तीय वर्षाचा अखेरचा दिवस असल्याने, अर्थात वित्तीय वर्षाच्या अखेरच्या काही दिवसांत आर्थिक कार्यांची मोठ्या प्रमाणावर धावपळ सुरू असलेली दिसून येते. अखेरच्या दिवशी उशिरा पर्यंत आर्थिक व्यवहार होत असल्याने बँकांना रात्री 12 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. वितरित होणारी देयके आणि चेक स्टेट बँकेत वटपुन रक्कम काढणे, महसुली उत्पन्नाच्या रकमा भरणा करणे आदी कामांसाठी पुरेसा वेळ मिळावा या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश दिले आहेत.
स्टेट बँकेची नाशिकरोड, देवळाली कॅम्प शाखा, तालुका मुख्यालय ठिकाणी असलेल्या स्टेट बँक शाखा, सुरगाणा येथील देना बँक आणि शासकीय व्यवहार होत असलेल्या बँका आज रात्री 12 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम