नाशिक प्रतिनिधी : घोटाळा तसा नवीन नसून ऐन महापालिका, जिल्हा परिषद आणि नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीआधीच नाशिकमध्ये 500 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप झाला अन एकच खळबळ उडाली तो. या कथित घोटाळ्याविरोधात भाजपचे नगरसेवक दिनकर पाटील व शहर सरचिटणीस सुनील केदार आक्रमक होत. या प्रकरणाची तक्रार ‘ईडी’कडे तक्रार केली आहे. या आरोपांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (Ncp) माजी खासदार देविदास पिंगळे अडचणीत आले आहेत.
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असून. बाजार समितीच्या 2013-2014 या वर्षातील लेखापरीणात 500 कोटी रुपयांच्या घोटाळा झाल्याचे आरोप झाले अन हा विषय चव्हाट्यावर आला व बिंग फुटले, असा दावा भाजपकडून करण्यात येतोय. गेली 20 वर्षे ही बाजार समिती पिंगळे यांच्या ताब्यात आहे. त्यामुळे हा घोटाळा अब्जावधी रुपयांचा आहे, असा आरोप भाजपकडून करण्यात आलाय. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी आणि बाजार समितीचे अफाट नुकसान झाले असल्याने, याप्रकरणी कारवाई करावी, अशी मागणी इडीकडे तक्रारीत करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार देविदास पिंगळे यांच्या ताब्यात बाजार समिती असल्याने, पिंगळे यांच्या वर्चस्वाला धक्का लावण्याचे काम शिवसेनेत असलेले चुंभळे यांनी केले. मात्र, पुन्हा बाजार समिती पिंगळे यांच्याकडे गेली. यापूर्वी पिंगळे यांच्या ताब्यातील गोदावरी कृषक संस्थेला आव्हान देण्यासाठीही भाजप नगरसेवरक दिनकर पाटील यांनी प्रयत्न झाला मात्र पाटलांना यश आले नाही.
दरम्यान आरोप झाल्यानंतर तातडीने पिंगळे यांनी हे आरोप फेटाळून लावलेत. ते बोलतांना म्हणाले, सेंट्रल गोदावरी कृषी सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुकीत पराभव पत्करावा लागल्यामुळे दिनकर पाटील व्यथित आहेत. बाजार समितीचे वर्षाचे उत्पन्न 16 कोटी असून. त्यात कर्मचाऱ्यांचा पगार, स्वच्छतेवर 13 कोटी जातात. मग उरतात फक्त 3 कोटी. त्यात 500 कोटींचा भ्रष्टाचार कसा होऊ शकतो. किमान अभ्यास करून तरी बोलत जावे, असा सल्लाही त्यांनी भाजपच्या मंडळींना दिला आहे. यामुळे भाजपा राष्ट्रवादी संघर्ष पुन्हा रंगण्याची शक्यता आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम