द पॉईंट नाऊ प्रतिनिधी (नाशिक) : नाशिक महानगरपालिका हद्दीतील सर्व प्रभागात CCTV बसविण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाद्वारे करण्यात आली आहे. याबाबत नुकतेच महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव यांना निवेदन देण्यात आले.
नाशिक शहरात मागील काही दिवसांत चोरी, घरफोडीच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या आहेत. त्यामुळे पोलीस यंत्रणेसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
शहरात महाविद्यालयांमध्ये होणारी मुलींची छेडछाड, महिलांचे दागिने चोरणे अशा घटना देखील मनपा हद्दीत वाढल्या आहेत. त्यामुळे उरलेला 3 कोटी 73 लाखांचा विकास निधी शासनाला परत करू नये. त्यातून प्रत्येक प्रभागात CCTV यंत्रणा बसविण्यात येण्याची मागणी करण्यात आली आहे.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस माहिती व तंत्रज्ञान सेल जिल्हाध्यक्ष संकेत निमसे, उपाध्यक्ष प्रतिक रायते, गौरेश सूर्यवंशी, डॉ. संतोष वाघ, अनिल गोसावी, शुभम मुरकुटे, निखिल निकम, विशाल लभडे, सागर दरेकर, प्रितेश भदाणे, प्रमोद कदम, नारायण गुंजाळ आदी उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम