नाशिक: पावसाळा तोंडावर असताना महापालिकेतर्फे पूर्व पावसाळी कामांच्या तयारीला सुरूवात झाली आहे. यातील एक भाग म्हणजे शहरातील मोडकळीस आलेल्या 1200 हून अधिक घरांना नोटिसा देण्यात आल्यात. नाशिक महानगरपालिकेच्या हद्दीतील तब्बल बाराशे हून अधिक वाढेल आणि घरे धोकादायक असल्याचे समोर आले आहे पावसाळ्यात ही घरे कोसळण्याची शक्यता निर्माण झाल्याने महापालिकेने यांना नोटिसा पाठवल्या आहेत. (more than 1200 houses demolished in Nashik)
मोडकळीस आल आलेली धोकादायक घरे कलम 264,265 व 266 नुसार खाली करून देणे आवश्यक असतानाही संबंधित मालक , भोगवटादार खाली करून देत नाहीत असे निदर्शनास आल्याने या इमारतींना तातडीने महाराष्ट्र महानगरपालिकेने कलम 266 नुसार नोटीस बजावल्या आहेत. तर धोकादायक इमारतींचा भाग उतरविताना काही दुर्घटना घडणार नाही याची दक्षता घ्यावी. धोकादायक इमारती, घरे, वाडे त्वरित खाली करून महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम