नाशिकमध्ये दाखल झाले ‘ईडी’चे पथक; बहुतांश जणांचे धाबे दणाणले

0
15

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी (नाशिक) : ईडीने आता नाशकात देखील धडक दिली आहे. सध्या ईडीच्या अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेस नेते नवाब मलिक यांच्या नाशिकमधील भंगार व्यावसायिकांशी व्यवहार संबंधित चौकशीसाठी ईडीचे पथक गुरुवारी नाशकात आले असल्याचे सांगण्यात येत आहे.

नाशिक मधील अंबड येथे भंगार व्यावसायिक आहेत. या भंगार व्यावसायिकांशी नवाब मलिक यांचे काही व्यावहारिक संबंध असल्याचे बोलले जात आहे. यामुळे आता नाशिक मधील देखील बहुतांश जणांचे धाबे दनानल्याचे बोलले जात आहे.

भंगार व्यावसायिकांची चौकशी देखील ईडीच्या पथकाने केली आहे. मात्र याबाबत काहीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. यामुळे नाशिकमधील भंगार व्यावसायिकांशी नेमका नवाब मलिकांचा काय संबंध, कसले व्यवहार, ईडीला नेमके भंगार व्यावसायिकांच्या चौकशीतून काय हाती लागले असेल असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.

सध्या ईडी राजकीय नेत्यांच्या आणि नातलगांच्या मागे हात धुवून लागलेली दिसत आहे. त्यात मोठे नेते ईडीच्या कोठडीत आहेत. तर अजूनही बऱ्याच जणांच्या चौकशी सुरू आहेत.

त्यात गुरुवारी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे वकील सतीश उके यांच्या घरावर देखील ईडीने छापे टाकून कसून चौकशी केली. त्यामुळे आता अजून किती धाडी पडणार, काय हाती लागणार, आणि महत्वाचं म्हणजे कोणाच्या घरी कधी धाड पडणार याचा काही एक अंदाज नसल्याने, सर्वांचेच धाबे दणाणले आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here