द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; महिलांवर अत्याचार हे पूर्वीपासून होतच आले आहेत. मात्र अजूनही या अत्याचारांना थांब मिळत नाही. असेच काही कृत्य नाशिक मध्ये घडले आहे. नाशिक मधील एका सरपंच महिलेने स्वतःच्या जीवाला कंटाळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
निफाड तालुक्यातील मरळगोई खुर्द या गावात ही घटना घडली आहे. महिला सरपंचच्या भावाच्या तक्रारी नंतर आत्महते प्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात तक्रारीची नोंद करण्यात आली आहे.
तक्रारी नंतर सासरच्या तिघाही जणांना अटक करण्यात आलं आहे. सांगण्यात येत आहे की महिला सरपंचाने विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
या संपूर्ण प्रकारात महिला सरपंच झाल्यानंतर त्रास देण्यात येत होता. अशा प्रकारची महिलेच्या भावने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली, मात्र पोलीस अजूनही संपूर्ण घटनेचा शोध घेत आहेत.
या संपूर्ण वक्तव्या वर आणि घटनेवर असे दिसून येते की आजुनही माहिलाना पूर्णपणे स्वतंत्र कुठे तरी मिळालेलं नाही . एका लोक प्रतिनिधीला जर असा छळ सहन करावा लागत असेल तर अतिशय धक्कादायक आणि भयानक प्रकार या समाजात होत आहे. जर सरपंचावर असे परिणाम होत असतील तर जनतेवर किती परिणाम होईल ? असे प्रश्न मात्र उपस्थित होतात.
समाजात होत असणाऱ्या घटना, रेप, आत्महत्या, छळ या महिलांनाच सहन कराव्या लागतात. मात्र समाजाच्या दृष्टिकोनातून अजूनही महिलांना अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो. देश कितीही तंत्रज्ञान विकसित असला किती ही परिपूर्ण असला तरीही अंधश्रद्धा रूढी परंपरेने भरलेला आहे. आणि या वर महिलांना बळी जावं लागतं आहे.
भावाच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल :
मयत महिला सरपंच योगिता फापाळे यांचे भाऊ संतोष शांताराम गवळी यांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. संतोष गवळी यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की सरपंच झाल्या पासून माझ्या बहिणीचा तिच्या सासुरवाडीचे लोक छळ करत होते. तक्रारीत म्हटल्यानुसार, माझ्या बहिणीचा कोणत्याही कारणावरून वारंवार मानसिक व शारीरिक छळ केला जात होता. योगिताने सासरच्या छळाला कंटाळून विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याची तक्रार गवळी यांनी केली आहे. सासरे बाबासाहेब फापाळे, पती अनिल बाबासाहेब फापाळे, सासु सरला फापाळे आणि दीर प्रदीप फापाळे (सर्व रा. मरळगोई खुर्द) या चौघांविरुद्ध लासलगाव पोलीस ठाण्यात भा.द.वि. 306, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पतीसह सासरच्या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम
[…] नाशिकच्या महिला सरपंचचा छळ ; जीवाला कं… […]