नाशिककरांनो थांबा तुम्हाला पेट्रोल हवे असेल तर हा नियम वाचा अन्यथा पेट्रोल मिळणार नाही

0
69

नाशिक प्रतिनिधी: नाशिककरांना आता नवीन नियमाला सामोरे जावे लागणार आहे. शहर पोलिसांनी प्रस्तावित केलेल्या ‘नो हेल्मेट, नो पेट्रोल’ योजनेत हेल्मेट शिवाय इंधन देऊ नये, असा फतवा काढला आहे. पोलिसांच्या या निर्णयावर पेट्रोल संघटनेच्यावतीने आक्षेप घेण्यात आल्यावर पुढील महिन्यात प्रत्येक पेट्रोल पंपावर पोलीस कर्मचाऱ्याची नियुक्ती करत या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल असे पोलीस सूत्रांनी सांगितले. यामुळे संघटनेचा विरोध झुगारून नाशिकमध्ये नवी नियमावली लागू होणार आहे. ग्राहकांना इंधन भरण्यासाठी हेल्मेट सक्तीचे असणार आहे.

या वादावर तोडगा काढण्यासाठी पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय आणि संघटनेचे पदाधिकारी यांच्यात एकत्रित बैठक झाली. या बैठकीत संघटनेने पेट्रोल पंप चालकांच्या अडचणी मांडल्या. जिल्ह्यात एकूण ४५० पेट्रोल पंप असून ते संघटनेचे सभासद असून यातील ७० टक्के वितरकांचे शहरात पेट्रोल पंप आहेत. पोलीस आयुक्तालय हद्दीत ऑगस्ट २०२१ पासून ‘नो हेल्मेट, नो पेट्रोल’ योजना प्रस्तावित आहे. हेल्मेट वापराबद्दलची ही योजना चांगली चांगली असल्याचा सूर असताना वितरकांकडून मात्र यास विरोध होत होता. यावेळी त्यांनी पोलीस संरक्षण द्यावे असेही मांडले होते. याचा विचार करून प्रशासनाने पोलिस संरक्षण देण्याचा विचार केल्याची माहिती मिळत आहे.

१५ ऑगस्टपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार असल्याने हेल्मेट सक्तीचा नवा नियम लोकांना पचनी पडतो का हे बघणं महत्वाचे ठरणार आहे. त्यात विना हेल्मेट वाहन चालकांना पंप चालकाने इंधन दिल्यास त्याच्यावर कारवाई होणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच पोलीस यंत्रणेने संघटनेशी कुठलीही चर्चा केलेली नाही. म्हणून ही योजना एकतर्फी पंप चालकांवर लादली जात असल्याचा आक्षेप संघटनेने घेतला होता. नेमकं गौडबंगाल काय ही चर्चा सर्वत्र रंगली आहे.

  1. हा निर्णय अपघात टाळण्यासाठी असून भविष्यात राज्यात मॉडेल ठरेल यात काही शंका नाही. मात्र अंमलबजावणी कशी होते हे बघणं महत्वाचे राहील. बैठकीत पदाधिकाऱ्यांनी विविध विषयांवर चर्चा केली. योजनेस विरोध नसून वेगवेगळ्या अडचणी आणि शंकांविषयी चर्चा झाली. पोलीस आयुक्तांनी पेट्रोलपंप चालक, कर्मचारी यांच्या संरक्षणाची हमी घेत ही योजना अंमलात आणण्यात येईल, असे देखील सांगितले असल्याने पेट्रोल पंप चालकांनी संमती दिली. बैठकीस पोलीस उपायुक्त अमोल तांबे सहाय्यक आयुक्त नवलनाथ तांबे , राज्य संघटनेचे उपाध्यक्ष विजय ठाकरे, जिल्हा अध्यक्ष भूषण भोसले आदी उपस्थित होते.

author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here