नाशकात बापलेकाचा राहत्या घरी मृतदेह आढळल्याने खळबळ

0
184

द पॉइंट नाऊ प्रतिनिधी : नाशिकमधील पंचवटी परिसरात राहत्या घरी बापलेकाचा मृतदेह आढळल्याने सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. पंचवटी पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत व पुढील तपास सुरू आहेत.

नाशिकमधील पंचवटीतील सामाजिक कार्यकर्ते जगदीश जाधव आणि त्यांचा मुलगा यांचा त्यांच्या राहत्या घरात मृतदेह सापडल्याने सगळीकडे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पोलिसांनी केलेल्या तपासानुसार समोर आलेल्या माहितीनूसार, रात्री जेवण करून मुलगा आणि वडील दोघेही झोपले होते. मात्र, सकाळी वडील जगदीश जाधव ह्यांचा मृतदेह फॅनला गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडला तर मुलगा प्रणव हा बेडवर मृत अवस्थेत आढळून आला.

वडिलांनी कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मुलाच्या मृत्यूमागील कारण हे अद्याप समोर आलेले नाही. पंचवटी पोलिस पुढील तपास करत आहेत.

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here