नाशकात पाईपलाईन फुटून लाखो लिटर पाणी गेले वाया

0
13

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : नाशिकच्या सातपूर येथे हजारो लिटर पाणी अक्षरशः धो धो वाहत वाया गेल्याची घटना घडली आहे.

सातपूर येथे BSNL कंपनीचे काम सुरू आहे. हे काम सुरू असताना मध्यरात्रीच्या सुमारास पाईपलाईन फुटून हजारो लिटर पाणी वाया गेले. पाईपलाईन फुटल्याने उंचच उंच कारंजा उडत होत्या. त्यामुळे हे पाणी वाया गेले.

बी. एस. एन. एल. कंपनीचे काम सुरू असतांना, सातपूर – महात्मानगर या परिसराची पाण्याची पाईपलाईन फुटली.

जेसीबीच्या साहाय्याने रस्ता खोदण्याचे काम सुरू होते. यात जेसीबीमुळे पाईपलाईनला धक्का बसल्याने पाण्याची पाईपलाईन फुटली आणि पाण्याच्या कारंजा उडू लागल्या. जवळपास 50 फुटांपर्यंत उंच अशा या पाण्याच्या कारंजा उडत होत्या.

ही बाब शिवसेनेचे योगेश गांगुर्डे यांच्या लक्षात येताच, त्यांनी महानगरपालिकेला ही बाब लक्षात आणून देत, तात्काळ दुरुस्तीचे काम सुरू केले.

आधीच पाण्याच्या समस्येस सर्वांना सामोरे जावे लागते. आणि त्यात अशा प्रकारे पाणी वाया गेल्याने, बी. एस. एन. एल. कंपनीच्या गलथानपनावर प्रश्न उपस्थित केला जात आहे.

दरम्यान या प्रकारामुळे पाण्याचा अपव्यय मोठ्या प्रमाणात झाला. हे तर खरे आहेच. मात्र बी. एस. एन. एल. कंपनीने महानगरपालिकेच्या परवानगी शिवायच हे काम केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे महानगरपालिका प्रशासन आता यावर काय कारवाई करते? याकडे लक्ष लागले आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here