नाशकात गॅस गिझर लीक होऊन 21 वर्षीय तरुणीचा मृत्यू

0
10

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : गॅस गिझरमुळे अजून एक दुर्घटना घडली आहे. नाशिक शहरातील नाशिक रोड परिसरात गॅस गिझर लीक झाल्यामुळे एका 21 वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

नाशिकरोडच्या उपनगर भागात संकुल नगर मध्ये साक्षी जाधव या तरुणीचा मृत्यू झाला आहे. साक्षी अंघोळीला गेली असतांना, गॅस गिझर लीक होऊन बाथरूममध्ये गॅस पसरल्याने जीव गुदमरून साक्षीचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे. साक्षीचा मृतदेह बाथरूममध्ये आढळून आला होता.

नव्याने येत असलेली आधुनिक संसाधने माणसाची कामे सोपी करत असलं, तरी अशा प्रकारे ही संसाधने घातक देखील ठरत आहेत. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here