द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; नवसंवाद फाउंडेशनच्या वतीने ‘नवसंवाद ‘ दिवाळी अंकाचा प्रकाशन सोहळा नुकताच जेम्स इंग्लिश मिडियम स्कूल, नाशिक येथे संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या सुरवातीला महाराष्ट्रातील नवोदय विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा राज्यस्तरीय स्नेहमेळावा घेण्यात आला. यामध्ये महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील नवोदयचे माजी विद्यार्थी उपस्थित होते.
नवसंवाद फाउंडेशनतर्फे वर्षभरात १ लाखांहून अधिक झाडे लावण्यात आली. तसेच काव्यलेखन , चित्रकला , फोटोग्राफी , कथा स्पर्धा वर्षभरात आयोजित करण्यात आल्या होत्या. प्रास्ताविक देवळा येथील नवसंवादच्या संपादिका डॉ . कविता पवार यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. सदानंद दाते डीआयजी मुंबई, तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रविण कोरगंटीवार जिल्हा समाज कल्याण अधिकारी पुणे, अभय ननावरे सहआयुक्त, आयकर विभाग, राजेंद्र पाटील वैज्ञानिक, डी. आर. डी. ओ. नगरसेविका स्वाती भामरे , हिमगौरी आडके उपस्थित होते.
यावेळी नवोदय विद्यालयातील माजी विद्यार्थी सुदर्शन सोनवणे याने लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केल्याबद्दल सत्कार करण्यात आला. तसेच इतरही विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी केल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे आयोजन यशस्वी करण्यासाठी डॉ मदनलाल सोनवणे सातारा, विवेक घोडमारे गडचिरोली,राजीव भुते, सनद नालेवाड, राहुल निर्मल यवतमाळ, अनिल पवार हिंगोली, नयूम तांबोळी अहमदनगर, लक्ष्मी निश्चल, प्रशांत जाधव पुणे, मनीषा सोनवणे मुंबई, उत्कर्ष शिंदे, लखन दांडगे जालना, महेंद्र पांगारकर, बापू सोनवणे,
वृषाली जगताप, ज्योती चौधरी, तेजस शिरोरे, विपुल पाटील नाशिक, पांडुरंग देवरे, राज सपकाळ, धनश्री बहिरम नवसंवाद फाउंडेशन, नवकिरण हेल्पलाइनचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व सर्व पदाधिकारी यांनी केले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम