धाराशिव संचलित ‘वसाका’ चा गळीत हंगामाचा शुभारंभ

1
34

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; धाराशिव संचलित वसंत दादा पाटील सहकारी साखर कारखान्याचा ३६ वा गळती हंगामाचा शुभारंभ (दि २१) रोजी धाराशिव उद्योग समूहाचे अध्यक्ष अभिजित पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

यावेळी कारखान्याचे कर्मचारी देविदास शेवाळे ,हिरामन देवरे यांच्या हस्ते सपत्नीक गव्हान व काटा पुजन करण्यात आले. कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यावेळी म्हणाले की, करारानुसार ठरल्याप्रमाणे कामगारांचे थकीत वेतन देण्यासाठी आपण बांधील असून, कारखान्याच्या चालू गळीत हंगामासाठी सर्वच जुन्या व नव्या कामगारांची मोलाची साथ अपेक्षित आहे. ज्या प्रमाणे तुम्ही माझ्या कडून अपेक्षा करता त्याच बरोबर तुमच्या कडून ही तिच अपेक्षा मी व्यक्त करीत आहे , यावेळी कारखान्याचे कर्मचारी व उस उत्पादक कुबेर जाधव म्हणाले की, धाराशिव उद्योग समूहाचे अध्यक्ष आणि संचालकांनी शेतकी अधिकारी यांना बरोबर घेऊन उस लागवड व पुरवठा व्हावा म्हणून कार्यक्षेत्रात दौरा करून ऊस उत्पादक सभासदांचा विश्वास संपादन करावा. अध्यक्ष अभिजित पाटील यांनी या सूचनेची दखल घेऊन लवकरच संचालक मंडळ शेतकी अधिकाऱ्यांना सोबत घेऊन कार्यक्षेत्रात दौरा करणार असून, जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ऊस लागवड करावी,व कारखान्याला गतवैभव प्राप्त करण्यासाठी सहकार्य करावे यासाठी सभासदांशी संवाद साधला जाणार आहे.

वसाकाचा गळीत हंगाम सुरू झाल्याने सभासद व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक अमर पाटील, जेष्ठ संचालक आबासाहेब खरे, संदीप खरे, सुरेश सावंत, संजय खरात, नितीन बरडे, जेष्ठ सभासद कुंदन चव्हाण , नितीन सरडे ,लोहोणेर येथील प्रगतीशिल शेतकरी प्रसाद देशमुख , योगेश पवार , युनियनचे अध्यक्ष अशोक देवरे ,कार्याध्यक्ष कुबेर जाधव , रवींद्र सावकार आदींसह युनियनचे सर्व पदाधिकारी ,कामगार कर्मचारी तसेच कारखान्याचे जनरल मॅनेजर पठाण, चिप इंजिनिअर शेलार चिप केमिस्ट् सुर्यवंशी, कोजन इन्चार्ज संतोष कचोर,शेतकी अधिकारी शिंदे , सुरक्षा अधिकारी किरण आहीरे उपस्थित होते, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुबेर जाधव यांनी केले तर प्रास्ताविक आबासाहेब खारे यांनी केले कार्यकारी संचालक अमर पाटील यांनी आभार मानले .


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here