मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना धमकावून खंडणीची मागणी करणाऱ्या रेणू शर्मा हिची पोलीस कोठडीत पाठवणी करण्यात आली आहे. रेणू शर्मा हिला मुंबईत आणल्यानंतर मुंबई पोलिसांनी न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर केले. यावेळी झालेल्या सुनावणीअंती न्यायालयाने रेणू शर्मा हिला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. यादरम्यान पोलीस रेणू शर्माची चौकशी करून संपूर्ण प्रकरणाचा तपास घेतील. यात काय नवीन खुलासे होतात, याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.
रेणू शर्मा हिने पाच कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केला होता. याविरोधात मुंडेंनी मुंबई पोलिसांत तक्रार देखिल दाखल केली होती. त्यानंतर हे प्रकरण गुन्हे शाखेकडे सोपवल्यानंतर गुन्हे शाखेने अवघ्या काही तासांमध्ये इंदौरला जाऊन रेणू शर्मा हिला अटक केली. रेणू शर्मा हिच्याविरुद्ध यापूर्वीही अशा ब्लॅकमेलिंगच्या अनेक तक्रारी विविध पोलीस ठाण्यात नोंदवल्या गेल्या आहेत. त्यामुळे आता मुंबई पोलीस या सर्व प्रकारची सखोल चौकशी करणार आहेत.
धनंजय मुंडे यांच्या तक्रारीनुसार, रेणू शर्मा हिने यापूर्वीही त्यांच्याविरोधात ओशिवरा पोलीस ठाण्यात बलात्काराची खोटी तक्रार नोंदवली होती. पण, काही काळाने तिने ही तक्रार मागे घेतली होती. त्यानंतर फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात रेणू शर्माने आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून धनंजय मुंडेंना फोन करून पाच कोटी रुपयांचे दुकान आणि महागड्या मोबाईलची मागणी केली. मागणी पूर्ण न केल्यास तुमची बदनामी करेन, अशी धमकी दिली होती.
या धमकीनंतर धनंजय मुंडे यांनी एका ओळखीच्या व्यक्तीच्या हातून तीला तीन लाख रुपये आणि महागडा फोन दिला होता.मात्र, त्यानंतरही तीने 5 कोंटींसाठी तगादा लावला होता.
पिछले साल सोशल मीडिया पर एक पोस्ट से तुम्हारा मंत्री पद जानेकीं नौबत आ गई थी. अब अगर इस बार मेरी मांग पूरी नहीं की तो बदनाम कर दुँगी.अशा आशयाचा मेसेज रेणू शर्मा हिने धनंजय मुंडे यांना पाठवला होता. याचे पुरावे धनंजय मुंडे यांनी पोलिसांना दिले होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम