द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; तालुका धुळेमधील सोनगीर ते तालुका शिंदखेडामधील बाभळे शिवारातील जुन्या मुंबई-आग्रा महामार्गाजवळच्या शेतविहीरीत ४६ वर्षांच्या व्यक्तीचा मृतदेह बुधवारी दुपारी आढळून आला. तेव्हा तातडीने तेथे पोलिसांना बोलवण्यात आले. तपास करता असे आढळून आले कि प्रियकराच्या मदतीने पत्नीने आपल्या पतीला मारून त्याचा मृतदेह विहिरीत टाकला. याप्रकरणात शिंदखेडा पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले. तपासचक्रे फिरवत अवघ्या पाच ते सहा तासांत गुन्ह्याची उकल करण्यास पोलिसांना यश आले.
अनैतिक संबंधातून निंबा रुपला पाटील वय ४६ यांचा खून झाला असून, या प्रकरणी त्यांची पत्नी अनिता व प्रियकर शरद शालिग्राम पाटील वय ४१ पोलिसांच्या ताब्यात आहेत. निंबा पाटील, पत्नी अनिता व तीन मुलींसह सोनगीर येथील इंदिरानगरमध्ये वास्तव्यास आहेत. पती निंबा चरित्र्यावर संशय घेत पत्नीला सतत मारहाण करत होता. या त्रासाला कंटाळून तिने प्रियकर शरद पाटील यास पती निंबा याला संपविण्यास सांगितले. त्यानुसार शरद याने २० ऑक्टोबरला रात्री निंबा यास दारू पाजून ठार करत विहिरीत फेकून दिले.
पतीच्या हरविल्याची तक्रार दाखल
दरम्यान, निंबा पाटील २१ ऑक्टोबरपासून कामाला जातो, असे सांगून घरातून निघाला. मात्र, बारा दिवस झाले तरी तो परतला नाही म्हणून हरवल्याची तक्रार पोलिस ठाण्यात दाखल होती. तत्पूर्वी ४ ऑक्टोबरला त्याच्या पत्नीने पती मारहाण करतो, अशी फिर्याद देखील दिली होती. मात्र पोलिसांच्या तपासात वरील माहिती पुढे आली.
पायाला दगड बांधून फेकले
संशयित शरद याने मृत निंबा याच्या हाताला ॲल्युमिनिअमची तार, पायाला दगडासह वायर बांधून विहिरीत फेकून दिले होते. पुरावा नष्ट करण्यासाठी मृत निंबा याचे कपडे काढून केवळ बनियन व अंडरपॅंट राहू दिली गेली.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम