धक्कादायक ! पन्नास रुपयांच्या उधारीसाठी पुतण्याने काकाला संपवले

0
45

जळगाव प्रतिनिधी : माणूस इतका संकोचीत झाला पैशाच्या हव्यासापोटी माणसाचा जीव स्वस्त झालाय, जळगाव मध्ये धक्कादायक प्रकार घडला असून पन्नास रूपयाचा उधारीसाठी काका पुतण्यांमध्ये झालेल्या हाणामारीत काका धक्कालागून गटारीत पडल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

यासंदर्भात माहिती असी की, धरणगाव तालुक्यातील कंडारी येथे राजू मानसिंग भिल (वय २८) आणि भारत सुकडू भिल (वय ४४) या दोघांमध्ये ५० रुपयांच्या उधारीवरून सोमवारी ७ फेब्रुवारी रोजी रोजी रात्री आठ साडेआठ वाजेच्या सुमारास शाब्दिक चकमक सुरू झाली. थोड्याच वेळात शाब्दिक चकमकीचे रूपांतर हाणामारीत झाले. या हाणामारीत राजुने आपले काका भारत यांना जोराचा धक्का दिला.

या धक्क्यात भारत हे जवळच्या गटारीत जाऊन पडले. गटारीत पडल्यामुळे त्यांच्या डोक्याला जबर मार बसून मोठा रक्तस्त्राव झाला. यानंतर भेदरलेल्या पुतण्या राजूने त्यांना लागलीच नातेवाईकांच्या मदतीने रूग्णालयात दाखल केले. परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती भारत भिल यांना मृत घोषित केले. यासंदर्भात पुतण्या राजू भिल याच्या विरोधात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अमोल गुंजाळ हे करीत आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here