द पॉईंट नाऊ ब्युरो : पुन्हा एकदा वृद्धेवर बलात्काराची घटना घडली आहे. दिल्लीच्या टिळकनगर भागात एका 87 वर्षीय वृद्ध महिलेवर नराधमाने बलात्कार केला. नागपूरमध्ये नुकतीच एका वृद्ध महिलेवर बलात्काराची घटना घडली होती. त्यानंतर दिल्लीतील या घटनेने खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, ही 87 वर्षीय पीडित महिला आपल्या 65 वर्षीय मुलीसोबत राहत होती. तिच्या घरात घुसून तिच्यावर बलात्कार करण्यात आला. याबाबत पोलिसांनी तक्रार घेण्यात दिरंगाई केल्याचा आरोप पीडित महिलेच्या कुटुंबांनी केला आहे. या घटनेत पोलिसांनी तक्रार घेण्यासाच नकार दिल्याने सुरुवातीला केवळ मोबाईल चोरीची तक्रार करण्यात आली होती असे सांगण्यात येत आहे.
देशात वाढत्या बलात्काराच्या घटना चिंता वाढवणाऱ्या आहेत. त्यात आता वासनांध माणूस हा आता वयोवृद्ध महिलांना देखील सोडत नसल्याने, वासनांधतेने पातळी ओलांडली आहे. या घटनांना चाप कधी बसणार अशी चिंता व्यक्त केली जात आहे. दिल्लीतील या घटनेची महिला आयोगाने दखल घेतली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम