धक्कादायक; आईच्या मृतदेहासह बंद खोलीत दहा दिवस राहीली लेक

0
17

द पॉइंट नाऊ प्रतिनिधी : १० दिवस मुलगी आपल्या आईच्या मृतदेहा बरोबर राहत होती. पण काही दिवसानंतर शेजाऱ्यांना परिसरात कुबट वास येऊ लागला. कोणत्या घरातून येत आहे हे पाहण्याकरिता त्यांनी पोलिसांना फोन केला. पोलिसांनी तपास करत असताना जे समोर आले, ते पाहून पोलिसांना ही धक्का बसला.

लखनौमधील  इंदिरा नगर भागात ही घटना घडली आहे. २६ वर्षाची अंकिता दिक्षित आपल्या आईच्या प्रेतासोबत राहत होती. आईचे प्रेत घरातील एका खोलीत  होते, तर मुलगी दुसऱ्या खोलीमध्ये होती. अंकिताने आईच्या मृत्यूबाबत तिच्या नातेवाईकांना काहीही कळवले नव्हते. जेव्हा शेजारी राहणाऱ्या लोकांना कुबट वास येऊ लागला, तेव्हा त्यांनी पोलिसांना तातडीने बोलावले. पोलिसांना तपास केला असता मुलगी आणि तिच्या आईचा मृतदेह आढळला.

मृत व्यक्तीचे नाव सुनीता दिक्षित आहे. त्या हिंदुस्तान एरॉनॉटिक्स लिमिटेड कंपनी मधून सेवानिवृत्त झाल्या होत्या. त्यांचा पती राजनाथ दिक्षित सोबत त्यांचा १० वर्षांआधी घटस्फोट झाला होता. घरामध्ये आई व मुलगी दोघीच राहत असून सुनीता यांना कॅन्सर झाला होता. जेव्हा पोलीस त्यांच्या घरात गेले, तेव्हा दार बंद होते. पण त्यांना महिलेचा आवाज येत असल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांनी दार वाजवले, तेव्हा अंकिताने ते दार उघडलं नाही, पण तिने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. तेव्हा पोलिसांनी ते दार तोडलं.

आतमध्ये गेल्यावर त्यांनी पाहिले की एका खोलमध्ये अंकिता होती, तर दुसऱ्या खोलीमध्ये तिच्या आईचा मृतदेह होता. अंकिताची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे यावेळी समजले. सुरुवातीस अंकिताला काहीही बोलता येत नव्हते. पण थोड्या वेळाने तिने आपली ओळख सांगितली.  मृतदेह हा दहा दिवस जुना असल्याची माहिती समोर आली. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. शवविच्छेदनाचा अहवालानंतर या प्रकाराची पुढील कारवाई केली जाईल.

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here