देवळा – मालेगाव रस्त्यावर 45 लाखांचा गुटखा जप्त ; विशेष पथकाची कारवाई

0
38

नाशिक प्रतिनिधी : गुटखा खाऊन पिचकाऱ्या मारणाऱ्यांची कमी नाही यांना आधार देण्यासाठी गुटखा बंदी असतांना लाखोंचा गुटखा अवैधरित्या वाहतूक होत असतो, काल नाशिक परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या पथकाने केलेल्या कारवाईत नाशिक जिल्ह्यातील देवळा ते मालेगाव मार्गावर ४५ लाखांचा गुटखा जप्त केला असून . आरोपी वाहनचालकाला अटक करण्यात आली असल्याची माहिती आहे.

विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या पथकातील पो नि बापू रोहम, स पो नि सचिन जाधव, सहाय्यक फौजदार बशिर तडवी, हे कॉ सचिन धारणकर, रामचंद्र बोरसे, पो ना मनोज दुसाने, कुणाल मराठे, प्रमोद मडलीक, सुरेश टोगांरे यांनी देवळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत देवळा ते मालेगाव मार्गावर एम एच 15 जी व्ही 7623 क्रमांकाच्या आयसर मालवाहू गाडीतून नेली जात असलेली विमल गुटखाने भरलेली 113 पोती जप्त केली या गुटख्याची किंमत 45 लाख 26 हजार 315 रुपये असून जप्त करण्यात आलेल्या वाहनांची किंमत 12 लाख रुपये आहे. आरोपीच्या ताब्यातून एक मोबाईलही जप्त करण्यात आला. आहे पोलीस पुढील तपास करत असून या कारवाईने खळबळ माजली आहे.

चालक अतुल अशोक शिंदे ( रा.नाशिक ) याला अटक करण्यात आली तर गोडाऊन मालक वाजदा (गुजराथ) , खरेदी करणारे राजु कोठावदे ( रा.मालेगाव ) , सुनिल अमृतकर ( रा.नाशिक ) , माँन्टी ( रा.नाशिक ) यातील हे ४ आरोपी मात्र फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या आरोपींच्या विरोधात देवळा पोलीस ठाण्यात भादवि कलम .272,273, 328, प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here