दिंडोरी प्रतिनिधी : दिंडोरी तालु्यातील कन्येला MPSC परीक्षेत यश आले असून रयत शिक्षण संस्थेचे जानोरी येथील महात्मा फुले विद्यालयात सेवेत असलेले उपशिक्षक बापू दिवे (Bapu Dive) यांची कन्या पायल दिवे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात आलेल्या परिक्षेत महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागात सहाय्यक अभियंता पदासाठी निवड झाली आहे. या निवडीने आनंदोत्सव साजरा केला आहे.
पायल ही रयत शिक्षण संस्थेची विद्यार्थिनी असून तिचे रयत शिक्षण संस्थेत 12 वी पर्यंतचे शिक्षण झाले आहे. वीरमाता जिजाबाई टेक्नोलॉजिकल इंन्स्टिट्युट, माटुंगा, मुंबई युनिव्हसिर्ंटी येथे अभियात्रिकी पदवी पर्यंतचे शिक्षण सन 2018 या साली पूर्ण केले.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन 2019 मध्ये झालेल्या परिक्षेचा निकाल नुकताच लागला असून यामध्ये पायल दिवेची निवड झाली आहे. पहिल्याच प्रयत्नात यश मिळण्यासाठी पायलने घेतलेल्या परिश्रमाचे व तिचे वडील बापू दिवे यांनी केलेल्या मार्गदर्शनाचे परिसरातून कौतुक होत आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम