‘दारू’ प्यायला 20 रुपये दिले नाही म्हणून केला ‘खून’

0
19

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; नाशिक येथे काल रात्री उशिरा खून झाल्याने शहरात खळबळ उडाली, अनेक दिवसांपासून हे सत्र सुरू आहे. या खुनाचे कारण मात्र फारच विचित्र असून माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना आहे.

नाशिक मधील जुना आडगाव नाक्यावरील रामरतन लॉज येथे दारू प्यायला 20 रुपये दिले नाही म्हणून बिगारी काम करणारा सुनील नामक व्यक्ती चा  मारेकर्‍यांनी गळा चिरून रात्री हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले.

रात्रीच्या अंधारात हत्या झालेला युवक हा जुना आडगाव नाका पासून वाघाडी ते सेवा कुंज पर्यंत पळत पळत गेला आणि रस्त्यालगत रक्ताच्या थारोळ्यात पडला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. वतपास सुरू केला.

रात्री उशिरा सुनील आणि त्याचे 3 मित्र हे बसले होते अचानक गायकवाड नामक इसम तिथे आला त्याने सागर नावाच्या व्यक्तीला दारू प्यायला 20 रुपये मागितले मात्र तिथे असलेला सुनील ने त्याला बोले की तू कोण तुला का देऊ पैसे असे बोलला. याचा राग येऊन त्या दोघांन मध्ये बाचा बाची झाली आणि गायकवाड याने खिशात असलेला धार धार असलेला चाकू बाहेर काढला आणि त्याच्या गळ्यावर मारून तेथून पसार झाला धार धार शास्रने वार असताना सुद्धासुनील 1 ते दीड किलोमीटर पळत होता मात्र रस्त्यालागत रक्ताच्या थारोळ्यात तो पडला कदाचित त्यात मदत झाली असती तर त्याचा प्राण वाचले असते.

या युवकास उपचारासाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र त्या युवकाचा रुग्णालयात नेट असता त्याचा रस्त्यातच मृत्यू  झाला. मारेकऱ्याला पोलिसांनी पकडले असून पुढील तपास पंचवटी पोलीस करत आहे.

सध्या नाशिक शहरात सतत ह्या घटना घडत असल्याने नाशिकचे नाव खराब होत असून, पोलिसांचा धाक उरला नाही अशी स्थिती सर्वत्र दिसत आहे.

 


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here