दारू तस्करांचा मध्यरात्री ‘धूम स्टईल’ राडा ; पोलिसांनी आवळल्या मुसक्या

0
16

नाशिक प्रतिनिधी : राज्यात अवैध दारूचा सुळसुळाट असून गुजरात मधून नाशिक – पेठ मार्गाने विदेशी दारूची तस्करी करणारे बलसाड जिल्हातील दोन संशयित आरोपींच्या नाशिक पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत, संशितांनी दारूबंदी सिमा तपासणी नाक्यावरील कर्मचाऱ्यांच्या वाहनास धडक दिली. यानंतर या दोघांनी घटनास्थळावरून पळ काढला.

या घटनेनंतर प्रशासनाने सूत्र हलवत या प्रकरणी शासकीय कामात अडथळा निर्माण करण्याच्या प्रयत्न व पोबारा केल्याप्रकरणी विभागाचे निरीक्षक मंगेश नारायणराव कावळे यांच्या तक्रारीरून संशयित संजयभाई नाणूभाई पटेल रा . डुंगरी उदवाडा ता. पार्डी जि . बलसाड व किंजलभाई चंपकभाई पटेल रा . बेरीफलीया ता . वापी , जि . बलसाड यांचे विरुद्ध गुन्हा . रजि. क्र. ६२/ २०२२ भादवि कलम ३५३ , ३३२, ४२७ , ३४ प्रमाणे गुन्ह्याची नोद करण्यात आली असून पोलिस पुढील तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, गुजरात राज्यातून महाराष्ट्रात बेकायदेशिरपणे आरोपीचे वाहन महिंद्रा एक्सयुव्ही ५०० लाल रंगाची कार क्रमांक जीजे २१ एएच ९९९३ मध्ये पेठ मार्गे नाशिकला दारूची वाहतुकीची माहिती प्राप्त झाली होती.

करंजाळी (Karanjali) येथील राज्य उत्पादन शुल्क सिमा तपासणी नाक्याच्या कर्मचाऱ्यांना खबर मिळल्याने संशयित वाहन येताच त्यास थांबण्याची सुचना करूनही वाहन न थांबविता अंगावर गाडी घालून संशयित फरार झाले आहेत.

यावेळी या वाहनाचा पाठलाग करण्याचा प्रयत्न झाला. दरम्यान, उत्तम पोलिसिंग झाल्यामुळे वाहन पेठचे दिशेने आणतांना या घटनेची खबर पेठ पोलिसांना लागली. त्यानंतर त्यांनी सर्व मार्गावर बॅरीकेटस लावुन वाहन चालक व त्याचा साथीदारासह वाहन शिताफीने पकडत मुसक्या आवळल्या आहेत.

या प्रकरणी पोलीस निरीक्षक दिवानसिंग वसावे यांच्या मार्गदर्शनखाली पोलीस उपनिरीक्षक कपिले अधिक तपास करत आहेत.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here