दहशत माजवणारे गुंड नाशिक शहरातुन तडीपार

0
53

नाशिक प्रतिनिधी : शहरात धुमाकूळ घालणाऱ्या गुंडांना पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे, नाशिकच्या शुभम पार्क परिसरात मद्यधुंद अवस्थेत चारचाकी वाहनाची व दुकानांची तोडफोड करणाऱ्या चार गुंडासह एकावर तडीपराचा प्रस्थाव अंबड पोलिसांकडून तयार करण्यात आलाय यामुळे गुन्हेगारांना चांगलाच धडा बसणार आहे.

काही दिवसापूर्वी शुभमपार्क परिसरात मद्यधुंद अवस्थेत संशयित वैभव लोखंडे , वैभव खिरकाडे ,अविनाश गायकवाड, अविनाश भावसार यांच्या सह एका अल्पवयीन मुलाने कोयत्याच्या साहाय्याने दहशत निर्माण करत चार चाकी वाहनाच्या व दुकानाच्या काचा फोडल्या होत्या. या संशयितांवर पूर्वी किती गुन्हे दाखल आहे याची तपासणी करत ही कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. येणाऱ्या महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीकोनातून या कारवाई मुळे गुंडांना आळा बसेल अस सामान्य कडून बोल जातंय. पोलिसांच्या या भूमिकेने समाज मन सुखावले असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here