त्र्यंबकरोड परिसरातील अपघातग्रस्त इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू

0
50

नाशिक प्रतिनिधी : नाशिक शहरात अपघाताचे सत्र सुरू असून, त्र्यंबकरोडनाका परिसरातील राजदूत हॉटेल जवळ दुचाकीवर डबलसिट प्रवास करीत असतांना तोल जावून पडल्याने एकाचा उपचार दरम्यान मृत्यु झाला आहे.

याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात दुचाकीचालका विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून. अनिरूद्द अनिल पाठक (४५ रा.अंबर सोसा. श्रीरामनगर पंचवटी) असे दुचाकीवरून मृत्यु झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पाठक गेल्या ५ जानेवारी रोजी मित्र समीर वडुलेकर (रा.कामटवाडे) यांच्या अ‍ॅक्टीव्हावर एमएच १५ डीएफ ००६४ प्रवास करीत असतांना हा अपघात झाला होता.

प्रवासा दरम्यान जिल्हारूग्णालया समोरून प्रवास करीत असतांना चालकाचा तोल जाऊन दोघे मित्र जखमी झाले होते. त्यातील पाठक यांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला. याप्रकरणी सहाय्यक निरीक्षक काकवीपुरे अधिक तपास करत आहेत.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here