The point now: निफाड तालुक्यातील तामसवाडी (Tamaswadi) येथे रस्त्याच्या कडेला लपून बसलेल्या बिबट्याने अचानक दुचाकीस्वारांवर झडप घातली. या घटनेत दुचाकी घसरल्यामुळे दोघेही दुचाकीस्वार जखमी झाले असून दोघांवर सिन्नरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तामसवाडी येथील पुंडलिक कांदे यांच्या वस्ती जवळ बिबट्या लपला होता. दुचाकीवरून वंडागळीकडे जात असताना विकास गिते (वय 29)आणि रोहित भोई (वय 23) या दोन तरुणावर हल्ला करुन बिबट्याने त्यांना जखमी केले. यानंतर त्यांना दोघांना सिन्नर येथील ग्रामीण दवाखान्यात दाखल करण्यात आले. जखमींच्या पायाला बिबट्याचा पंजा लागल्याने ते जखमी होऊन खाली पडले आरडाओरड करताच तेथील शेतकऱ्यांनी धाव घेऊन बिबट्याला पळवून लावले आणि जखमी झालेल्या विकास, रोहित यांना निफाड येथील शासकिय रुग्नालयात दाखल करण्यात आले.
तामसवाडी करंजी तारुखेडले या गावांमध्ये दिवसेंदिवस बिबट्याचे प्रमाण वाढले असुन रात्रीच्या वेळी बाहेर पडणे देखील अवघड झाले आहे. वनविभागाने याठिकाणी पिंजरे लावून या गावामधील बिबट्याचे जेरबंद करावे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम