दिनेश भागवत
नाशिक प्रतिनिधी : शहरातील मुंबई नाका येथील डॉ. होमी भाभा नगर गार्डनचा लोकार्पण कार्यक्रम परिसरातील जेष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आले. आज शिवसेनेच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला. एरवी नेतेमंडळी स्वतःच्या हाताने उद्घाटन करण्यास उत्सुक असतात मात्र शिवसेना नेते याला मात्र अपवाद ठरलेत या निर्णयाचे उपस्थित मान्यवरांनी स्वागत केले.
कार्यक्रम प्रसंगी शिवसेना नेते माजी आमदार वसंतभाऊ गिते , नगरसेवक प्रथमेश गिते,करुणा सागर पगारे, श्रीकांत बेणी, डॉ.प्रशांत पुरंदरे, वाल्मिक मोटकरी, विकास शेवाळे, आशिष ठोंबरे , पी.कुमार, कदम सर, नरेश माळवदे ,उदय जोशी, यतींद्र भागवत, अनिल आहिरे, अमोल पगारे, क्षीरसागर काका ,नंदू कुऱ्हाडे, संजू कुऱ्हाडे, सचिन होते, युवानेते दादा वाघ, रोहित हिरवे, प्रशांत भदाणे, सुजित सोनवणे, श्रीकांत जोशी, गणेश मोरे, आदी उपस्थित होते.
या प्रसंगी बोलताना माजी आमदार गिते यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. व भाभा नगर व जनरल वैद्य नगर हे नाव कसे पडले याबाबत त्याचा सांगितले. खगोल शास्त्रज्ञ भालेराव सर, चौधरी सर यांचा आवर्जून उल्लेख या प्रसंगी केला. परिसरातील बाळगोपाळ गार्डनमधील विविध प्रकारच्या खेळण्याचा आनंद देखील घेतला, नव्याने लोकार्पण झालेल्या उद्यानामुळे परिसरातील बालगोपाल ,जेष्ठ नागरीक व महिलावर्ग यांना प्रचंड आनंद झाला.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम