नाशिक प्रतिनिधी : महाविद्यालय म्हणजे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणार व्यासपीठ. यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वार्षिक स्नेहसंमेलन २०२२ हे ऑनलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय महाविद्यालयाच्या प्राचार्यानी घेतला व याही वर्षी विद्यार्थाना आपले कलागुण सादर करण्याची संधी मिळवून दिली.
“DIT Fest 2022” चे उद्घाटन दिनांक २४ जानेवारी २०२२ रोजी महाविद्यालायाच्या प्राचार्या डॉ. मनीषा राणे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. दिनांक २४ जानेवारी २०२२ ते २८ जानेवारी २०२२ रोजी विविध गुणदर्शन स्पर्धा संपन्न झाल्या. त्यामध्ये स्वातंत्र्यासाठी बलिदान देणारे क्रांतिकारक व भारताची स्वातंत्रानंतरची १०० वर्षे याची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी या दृष्टिकोनातून “आझादी का अमृत महोत्सव व माझी वसुंधरा” ही थीम वार्षिक स्नेहसंमेलनासाठी निवडण्यात आली होती. त्यामध्ये पावरपॉईंट प्रेझेंटेशन(स्वातंत्र्यानंतरची १०० वर्षे), विडिओ मेकिंग(भारताचे स्वतंत्र सैनिक), फोटोग्राफी स्पर्धा(भारतीय संस्कृती-सन व उत्सव), रांगोळी स्पर्धा (माझी वसुंधरा), वैयक्तिक नृत्य स्पर्धा (देशभक्तीपर नृत्य), गायन स्पर्धा (देशभक्तीपर गीत गायन), निबंध स्पर्धा, सूर्यनमस्कार, योगासन इत्यादी या सारख्या स्पर्धा विडिओ रेकॉर्डिंग व ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आल्या. स्पर्धांसाठी विद्यार्थ्यांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.
वार्षिक स्पर्धा व विविध गुणदर्शन स्पर्धा मधील यशस्वी विद्या र्थ्यांचा गुणगौरव समारंभ दिनांक ११ फेब्रुवारी २०२२ रोजी ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आला. कार्यक्रमाची सुरवात डिजिटल दिपप्रज्वलन आणि सरस्वती पूजनाने झाली. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मनीषा राणे यांनी मान्यवरांचे स्वागत केले व उपस्थितांना परिचय करून दिला. कु. दिशा नावानी हिने शैक्षणिक वर्ष २०२१-२०२२ या वर्षाचा वार्षिक अहवाल पवारपोईट प्रेसेंटेशनच्या सहाय्याने सादर केला. कुणाल खोडे याने वार्षिक स्नेहसंमेलन २०२२ मधील काही क्षण चल चित्रफितीच्या सहायाने सदर केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदरणीय सर डॉ. एम. एस. गोसावी, सेक्रेटरी व डायरेक्टर जनरल, गोखले एज्युकेशन सोसायटी, नाशिक हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रमुख अथिती सन्माननीय डॉ. मिलिंद पांडे यांनी आपला बहुमूल्य वेळ देऊन विद्यार्थ्यांना भविष्यातील यशस्वी वाटचालीसाठी मार्गदर्शन केले त्याबद्दल आनंद व्यक्त करून अध्यक्षीय मार्गदर्शनास सुरवात केली. भारतीय संस्कृतीचा प्राचीन वारसा जपून आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने यश संपादन करा, कौटुंबिकता आणि कौशल्य आत्मसात करा, असे आव्हान विद्यार्थ्यांना आपल्या मार्गदर्शनातून सरांनी केले. यशस्वी विद्यार्थ्यांनचे कौतुक करत त्यांच्या भावी वाटचाली साठी शुभेच्या दिल्या.
सन्माननीय डॉ. मिलिंद पांडे, प्रो- व्हाईस चान्सलर, महाराष्ट्रइन्स्टिट्यूट ऑफ टेकनॉलोजी, विश्व शांती विद्यापीठ, पुणे हे पारितोषिक वितरण समारंभास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. आरटीफ़िशिअल इंटेलिजन्स, इन्फोरमेशन टेकनोलोजी, या सारख्या आधुनिक संकल्पनांची माहिती देताना गुरूंचा व आई वडिलांचा आदर करा, कुटुंबव्यवस्था जोपासा, ऑनलाइन कोर्स करुन विविध कौशल्य विकसीत करा व IT(Information Technology)+IT(India’s Talent=IT(India’s Tommorow) या सूत्राचे स्पष्टीकरण देत आपल्या आई-वडिलांना, महाविद्यालयाला व राष्ट्राला भूषण वाटेल असा उत्तम नागरिक बना, असे आपल्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना संबोधन केले. विदयार्थांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आयोजित केलेलया ऑनलाईन वार्षिक स्नेहसंमेलन २०२२ चे विशेष कौतुक केले. त्यासाठी महाविद्यालयाच्या प्राचार्या व प्राध्यापकांचे विशेष अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्या दिल्या. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन वार्षिक स्नेहसंमेलनास भरभरून दिलेल्या प्रतिसादाबद्दल आणि मिळवलेल्या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले.
पारितोषिक वितरण कार्यक्रमात महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी विशेष पुरस्कार देखील जाहीर केले. आदर्श शिक्षक म्हणून श्री. प्रविणकुमार चव्हाण यांचा गौरव करण्यात आला. श्री. संतोष शर्मा यांना आदर्श प्रशासकीय कर्मचारी म्हणून गौरवण्यात आले. तसेच आदर्श विद्यार्थी म्हणून सिद्धार्थ गुंजाळ याची निवड करण्यात आली. वार्षिक गुणवंत , सांस्कृतिक व किडा स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार करण्यात आला. सत्कार समारंभाचे सूत्रसंचालन वाणिज्य विभाग प्रमुख अनुजा मोहाडकर यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी सभा प्रमुख श्रीमती मंगल शिंदे यांनी केले आणि आभार डॉ. नितीन गांगुर्डे यांनी मानले. कार्यक्रमासाठी निमंत्रित मान्यवर, प्राचार्या, उपप्राचार्या , महाविद्यालयातील प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थ्या उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम