डिजिटल रुपया क्रांती करेल – बी. के. सिंग

0
7

दिलीप बांबळे
इगतपुरी प्रतिनिधी : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी आज त्यांचा वित्तीय वर्ष 2022-23 साठीचा सलग चौथा अर्थसंकल्प सदर केला. यात सूक्ष्म-आर्थिक विकास, सर्वसमावेशक कल्याणकारी व तसेच डिजिटल अर्थव्यवस्था आणि फिन-टेक, तंत्रज्ञान सक्षम असलेला व तसेच मॅक्रो इकॉनॉमिक ग्रोथवर लक्ष केंद्रित करणारा आहे.

2023 पर्यंत ‘डिजिटल रुपया” (डिजिटल करन्सी) अमलात आणली जाईल, तज्ञांच्या मते क्रिप्टो चलनाच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर सर्वाधिक प्रतीक्षेत असलेली हि घोषणा आहे. डिजिटल रुपया कार्यान्वित झाल्यानंतर अर्थव्यवहार अधिक सुलभ होतील. क्रिप्टो चलनाकडे आकर्षित झालेली आजची तरुणाई या डिजिटल रुपयाचे नक्कीच स्वागत करील. या करन्सी मुळे, बँक व तत्सम कार्यालयात नवीन क्रांती होईल.

सरकार पर्यावरणीय किंवा हवामान बदल सकारात्मक होण्यासाठी हरित पायाभूत सुविधा प्रकल्पांना निधी देण्यासाठी सार्वभौम ग्रीन बाँड जारी करणार आहे. खासगी दूरसंचार कंपन्यांद्वारे ५जी मोबाइल सेवा सुलभ करण्यासाठी स्पेक्ट्रम लिलाव 2022 मध्ये आयोजित केला जाईल. यातून भ्रमणध्वनी क्षेत्रात मोठी क्रांती होणार आहे. औद्योगिक क्षेत्रासाठी इमर्जन्सी क्रेडिट लाइन गॅरंटी स्कीम (ECLGS) हि योजना मार्च 2023 पर्यंत वाढवण्यात आली आहे. आणि वाढीव हमी कव्हर साडेचार लाख कोटी वरून 5 लाख कोटी रुपये करण्यात आली आहे.

पायाभूत सुविधांसाठी असलेल्या खर्चासाठीची तरतूद 35.40 टक्क्याने वाढविण्यात आली आहे. हि मर्यादा 5.54 लाख कोटी वरून 7.50 लाख कोटी रुपये इतकी केली आहे. नागरिकांच्या सोयीसाठी 2022-23 मध्ये ई-पासपोर्ट आणले जातील. करदाते संबंधित मूल्यांकन वर्षाच्या समाप्तीपासून दोन वर्षांच्या आत अपडेटेड रिटर्न दाखल करू शकतील. या मुळे मुदत संपल्यानंतर आयटी रिटर्न अद्यावत करण्याची मुभा देण्यात आली आहे.

इमारतींचे आधुनिकीकरण, नगरांचे नियोजन या साठी येत्या काही वर्षांत नवीन कायदा तयार करण्यात येणार आहे. यामुळे मोठ्या शहरातील जीर्ण झालेल्या इमारतींचे रुपांतर अत्याधुनिक भव्य इमारांतीची उभारणी होण्यास प्रोत्साहन देण्यात आले आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी लागणाऱ्या जागेची कमतरता लक्षात घेऊन बॅटरी स्वॅपिंग धोरण आणणार असल्याचे अर्थमंत्री यांनी जाहीर केले आहे. व्यवसाय करणे सुलभ करण्यासाठी कुठेही नोंदणीसाठी वन नेशन, वन रजिस्ट्रेशन’ची स्थापना केली जाईल. अशी माहिती बी. के. सिंग यांनी दिली.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here