नाशिक प्रतिनिधी : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ठाणापाडा, हरसुल येथील हेमाडपंथी मंदिरांची दुरावस्था व वास्तू जिर्ण झालेल्या असुन, पुरातत्व विभागाबरोबरच तालुक्यातील व स्थानिक लोकप्रतिनिधींचेही याकडे दुर्लक्ष झाल्याची तक्रार शिवदुर्ग संवर्धन भ्रमंती संस्थेच्या दुर्ग संवर्धकांनी केली. शिवदुर्ग संवर्धन भ्रमंती संस्थेचे दुर्ग संवर्धक खैराई या किल्ल्यावर संवर्धनासाठी गेले असुन तेथेच मुक्काम केला. रविवारी हे दुर्ग संवर्धक गावात फिरत असताना त्यांना गावातील एका तरुणाने या मंदिरांविषयी माहिती दिल्यानंतर शिवदुर्ग संवर्धन भ्रमंती संस्थेच्या दुर्ग संवर्धकांनी पाहणी केली असता, त्यांना जैन, बौध्द, हिंदुंची तीन मंदिरे दिसून आली. या तिन्ही मंदिरांची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाल्याचे दिसून आले. या मंदिरांची मोठी पडझड झालेली दिसून आली. ठाणापाडा गावातील मध्यवर्ती ठिकाणी ही मंदिरे आहेत.
ठाणापाडा गावाला मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेली आहे. खैराए हा किल्ला याच ठिकाणी आहे. २२९६ फुट उंचीवर वसलेला खैराए किल्ला असुन, या किल्ल्याच्या पायथ्याशीच ठाणापाडा हे गाव वसलेले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी १६७६ मध्ये हा किल्ला जिंकला. या किल्ल्याप्रमाणेच ठाणापाड्यातील मंदिरांची ओळख जनतेला व्हावी, अशी ही ऐतिहासिक मंदिरे आहेत. मात्र या तिन्ही मंदिराची सध्या मोठी दुरावस्था झालेली आहे. या मंदिराच्या परिसरात केरकचरा टाकला जातो. इतर दोन मंदीरे पुर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहेत. मंदिरातील अनेक मुर्ती ऊन, वारा, पाऊस खात आहे.
या मंदिरांची दुर्दशा थांबविण्यासाठी पुरातत्व विभागाने या मंदिराची पाहणी करून तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी करणारे निवेदन या दुर्ग संवर्धकांनी पुरातत्व विभागाच्या सहाय्यक संचालक आरती आळे यांना शाम गव्हाणे, सागर पाटील, संतोष मिंदे, अनिल दाते, महेंद्र कोल्हे यांनी दिले होते. परंतु आजपर्यंत पुरातत्व विभागाने या अथवा कोणत्याही शासकीय कार्यालयाने व स्थानिक लोकप्रतिनिधींनी याची दखल घेतलेली नाही किंवा पुढील कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. सदर मंदिरांच्या झालेल्या दुरावस्थेची दखल आपल्या दैनिकाने घेतलेली होती. तसेच आपण आपल्या दैनिकामध्ये प्रसिद्ध केलेल्या बातमीमुळे अनेक दुर्ग संवर्धकांनी या मंदिरांची झालेली दुरावस्था पाहुन दुर्ग संवर्धन संस्थानी या मंदिरांच्या स्वच्छता व संवर्धनासाठी या संस्थेला सहकार्य करणार आहे असे आश्वासन दिले आहे. त्यामुळे शिवदुर्ग संवर्धन व भ्रमंती संस्था नाशिक या संस्थेने पुढाकार घेऊन ठाणापाडा येथील ऐतिहासिक व हेमाडपंथी मंदिरांची स्वच्छता आणि वास्तू संवर्धन मोहीम हाती घेवुन सदर मंदिरांची झालेली दुरावस्था पुर्ववत करण्याचे काम करुन सदर संस्था ही ताकदीने व मेहनतीने दुर्ग संवर्धनाचे काम सतत करत आहे व राहील. तेथील गांवकरी यांनी या मंदिरांची अक्षरशा कचराकुंडी केलेली होती. सदर सर्व कचरा या स्वच्छता मोहिमेमुळे योग्य त्या ठिकाणी उचलुन टाकण्यात आला. सदर मंदिरांची तसेच ऐतिहासिक वास्तुची आख्यायिका व संपुर्ण माहिती तेथील नागरिकांना समजावून सांगितल्यानंतर त्या गावातील नागरिकांनी देखील आमच्यासोबत या मोहिमेत सामील होवुन आम्हाला या कार्यात हातभार लावला आणि इथुन पुढे आम्ही तुमच्यासोबत आहोत व या मंदिराच्या स्वच्छतेकडे आम्ही सर्व गांवकरी लक्ष देऊ असे तेथील नागरिकांनी आम्हाला सांगितले. यावेळी मंदिरातील मंदिराच्या बाहेरील सर्व परिसराची साफ सफाई केली. ही या संस्थेची 25 वी मोहीम होती.
या मोहिमेसाठी सागर पाटील, गणेश रहाडे, पुरुषोत्तम रहाडे, विजय महाले, रोशन खांदवे, वैभव खांदवे, संतोष मिंदे, अनिल दाते, माधव पगार, अनुराग रहाडे, कृष्णा पगार, शाम गव्हाणे, शिवराज मिंदे आदी दुर्ग संवर्धक हे नेहमी या कामासाठी सदैव तत्परतेने काम करुन गड किल्ल्यांचे स्वच्छता व संवर्धन करत असतात.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम