राम शिंदे
द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : इगतपुरी तालुक्यातील सर्वतिर्थांचे माहेर घर असलेल्या तीर्थक्षेत्र सर्वतीर्थ टाकेद बु येथे अखंड हरिनाम सप्ताहास नुकताच प्रारंभ झाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करत होऊ घातलेल्या या अखंड हरिनाम सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध समाज प्रबोधनकार कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांचे समाज प्रबोधनात्मक कीर्तन नुकतेच पार पडले. या कीर्तनात प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर यांनी उपस्थितांना विज्ञानाच्या भाषेत अभंगातील अर्थ चालू परिस्थितीवर आधारित विश्लेषण करून सांगितली.
“झाडं आणि त्याचे उपयोग” झाडातील अंतरंग, झाडाचे विविध अवयव आणि त्यांचे कार्य वैज्ञानिक भाषेत विश्लेषण करून सांगितले,कोणतही झाडं असो वांज झाड असो उपयोगी झाडाचे जतन केले पाहिजे, झाडाची माहिती विनोदनात्मक भाषेत सविस्तर समजावून सांगितली. एक झाड वांज आहे त्या वांज झाडाचे नाव संसार आहे. ओव्यांचे विश्लेषण, शिक्षणाची रूपरेषा आणि सध्याची परिस्थिती, एक पोरगा graduate करायला काय लागत ना हे काळ्या आईची सेवा करणाऱ्या शेतकऱ्याला विचारा, नाही रे नाही कुणाचे कोणी
बहीण कुणाची भाव कुणाचा कोण कुणाचे सखे सोयरे, मोबाईल इंटरनेट आणि सद्याची पिढी, अज्ञान नावाची मुळी ही घालवायची आहे. भावी पिढीसाठी शाळा चालु होणे अत्यंत महत्त्वाचे आहे, जुना काळ रूढी परंपरा आणि त्याकाळची परिस्थिती आणि संस्कार आणि सध्याची पिढी यातील बदल.
शाळा व्यवस्थापन वच्छता, माता पित्याची पुण्याई म्हणून मी आज कीर्तनकार आहे, कोरोनाचा काळ आणि सध्याची ऑनलाईन शिक्षण प्रणाली आणि विद्यार्थ्यांचे होत असलेले नुकसान, गेम सोशल मीडिया यामध्ये अडकलेली लहान पिढी आणि त्याचे दुष्परिणाम, अज्ञान नावाची मुळी तोडली पाहिजे, तुम्हांला जमत नाही हा विषय डोक्यातून काढून टाका Mpsc upsc द्या सकाळी पळत जा, व्यायाम करा चांगला आहार घ्या रात्रंदिवस अभ्यास करा होऊद्यात एकदा नापास व्हाल चार वेळा व्हाल पण एकदा पास झाले तर तुम्हांला लाल दिवा आहे. अभंग आणि अध्याय यातील सविस्तर माहिती
ऐसे विठोबाचे नाम, माणसं माणसांच्या कृत्यामुळे मरतात, चांगला आहार चांगली वृत्ती, हिंदी गाणे यामध्ये व्यस्त असलेली तरुणाई या ला साजेसे होईल असे अभंग चरण आणि त्याचे विश्लेषण,
पाठ्य पुस्तकांमध्ये अभंग वाणी महत्वाची, विवाह समारंभ आणि त्यातील अवाजवी खर्च
आणि वधू वर त्यांची परिस्थिती आणि त्यांचा मित्र परिवार अश्या विविध विषयांवर निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांनी प्रभोधनातून कीर्तन केले आणि त्यांचे विचार मांडले. मास्क, मुखपट्टी, हँडवॉश, सॅनिटायझर चा सर्वांनी पुरेपूर वापर करा आणि कोरोनवर मात करा असे आव्हाहन टाकेद ग्रामपंचायतच्या वतीने उपस्थितीतांना करण्यात आली. कोरोना नियमांचे पालन करत हा कार्यक्रम संपन्न झाला.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम