” ज्या कबरीवर नमाज पठण करताय, उद्या त्याच कबरीत जावे लागेल ” – राऊतांचा ओवेसींनी इशारा

0
27

मुंबई प्रतिनिधी : राज्यात भोंग्यांचे प्रकरण ताजे असतानाच एमआयएम चे नेते अकबरुद्दीन ओवेसी यांनी त्यांच्या औरंगाबादच्या दौऱ्यावर असताना औरंगजेबाच्या कबरीला भेट दिली . त्यांच्या ह्या कृत्यावर शिवसेना आणि इतर राजकीय पक्षांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे . तर शिवसेना नेते संजय राऊत यांनी ” तुम्हालाही त्याच कबरीत गाडणार ” असे म्हणत ओवेसींना थेट इशारा दिला आहे .

संजय राऊत म्हणतात , ” औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन हा रितीरिवाज असू शकत नाही . संभाजीनगरला वारंवार यायचं आणि औरंगजेबाच्या कबरीपुढे गुडघे टेकायचे . यातून महाराष्ट्रात अशांतता निर्माण करायच राजकारण ओवैसींचं दिसत आहे . मी इतकंच सांगेन की , त्या औरंगजेबाची कबर महाराष्ट्राच्या मातीत मराठ्यांनी बांधली . त्याला कबरीत आम्ही टाकलं . महाराष्ट्रावर चाल करणारा हा मुघल राजा . तुम्ही आज त्याच्या कबरीवर येऊन नमाज पडत आहात… कधीतरी तुम्हालाही त्याच कबरीत जावं लागेल .

औरंगजेब हा महान संत नव्हता तो एक आक्रमक होता . महाराष्ट्रावर त्याने आक्रमण केलं . महाराष्ट्रातील मंदिरे , प्रार्थनास्थळे त्याने उद्वस्त केली . आता महाराष्ट्रात येऊन त्याच औरंगजेबाच्या कबरीवर येऊन नमाज पडायचं… हे महाराष्ट्राला चॅलेंज देण्यासारखं आहे . ठिक आहे आम्ही चॅलेंज स्वीकारलं . औरंगजेबाला याच मातीत आम्ही गाडलं होतं . औरंगजेबाचे भक्त आहेत जे राजकारण करत आहेत त्यांचीही तिच अवस्था होईल . ” असे म्हण राऊतांनी ओवेसींना खड्या शब्दात आव्हान दिले आहे .

 

 


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here