स्वप्नील अहिरे
सटाणा प्रतिनिधी
जुनी शेमळी: बागलाण तालुक्यातील जुनी शेमळी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने सरपंच वैशाली शेलार व उपसरपंच रोशन पवार यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचे पूजन व पुष्पहार अर्पण करण्यात आला.
उपस्थित ग्रामस्थांनी बुद्ध वंदना म्हणून बाबासाहेबांना विनम्र अभिवादन केले. याप्रसंगी संदीप बच्छाव, अनिल गायकवाड, जनार्दन शेलार, संजय पवार, गोकुळ गांगुर्डे, श्रीराम वाघ, कैलास खैरनार, भास्कर बच्छाव,सागर शेलार, सोमनाथ शेलार,गौतम धिवरे, प्रशांत शेलार, राहुल पवार, प्रवीण जगताप, आप्पा लोंढे, बापू ढेपले, श्याम लोंढे, शरद पवार, नाना मल्ले, गुलशन पवार,रवि पवार, कुलदीप पवार, गौरव पवार, समाधान बच्छाव, आधीसह. बाबा ग्रुपचे सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व उपस्थित ग्रामस्थांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे पूजन केले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम