नाशिक प्रतिनिधी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेल्या शाळा सोमवारपासून (२४ जानेवारी)राज्यातील सर्व शाळा सुरु करण्यास परवानगी देण्यात आल्याचा निर्णय राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (varsha gaikwad)यांनी गुरुवारी जाहीर केला होता.
स्थानिक पताळीवर निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला देण्यात आले होते. त्यानुसार नाशिक जिल्हा प्रशासनानेही सोमवारपासून जिल्ह्यातील सर्व शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सोमवारी शाळांची घंटा वाजणार असून विद्यार्थी पुन्हा शाळेत जाणार असल्याने आनंदोत्सव साजरा होत आहे.
शाळा पुन्हा सुरू होणार असल्याने पालकांनी समाधान व्यक्त केले आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे सर्व खबरदारी घ्यावी लागणार आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम