द पॉईंट नाऊ प्रतिनिधी (मध्य प्रदेश) : एका तरुणीला महिनाभर डांबून ठेवत तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मध्य प्रदेश मधील इंदूर येथे हा प्रकार घडला.
आरोपीने एका 32 वर्षीय तरुणीला जवळपास महिनाभर फार्म हाऊसवर डांबून ठेवले. तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. सदर आरोपी इथेच थांबले नाहीत. तर त्याने तरुणीच्या शरीराच्या वेगवेगळ्या भागावर चावे घेतले, सिगारेटचे चटके दिले.
पीडित तरुणीने तावडीतून सुटका करून घेत पळ काढल्याने हा संतापजनक प्रकार समोर आला. यानंतर आत्तापर्यंत दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
या अशा अमानवी कृत्याने खळबळ उडाली आहे. देशात बलात्काराच्या घटना अजूनही थांबत नाही आहेत. अशा प्रकारे काही पुरुषाच्या हिंसक वृत्तीने महिलांना आपला जीव मुठीत धरून राहावे लागत आहे.
आता मध्य प्रदेशातील या घटनेत अजून किती आरोपी पकडले जातात. हे लवकरच समजेल.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम