द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; वडापाव (Vadapav) हा सामान्य नागरिकांचा (Common Man) अतिशय जिव्हाळ्याचा आहे. आता याच वडापाव (Vadapav) मध्ये नाव कमावलेल्या छोटू (Chhotu)या फ्रांचायजीवर
(Franchise) कारवाई करण्यात आली आहे.
नाशिकच्या (Nashik) उत्तम नगर (Uttam Nagar) येथील छोटू (Chhotu) वडापावच्या फ्रांचायजीवर कारवाई करण्यात आली आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाने ही कारवाई केली.
वडापाव हा चाकरमान्यांसाठी अतिशय आवडता आणि तात्काळ पोटाला दिलासा देणारा पदार्थ आहे. मात्र याच वडापावच्या बळावर आपले नाव कमावणाऱ्या छोटू या फ्रांचायजीने आपल्या ग्राहकांना मोठाच धक्का दिला आहे.
छोटू (Chhotu) मध्ये वडापाव साठी वापरण्यात येणारे तेल हे बदलण्यात येत नाही. तसेच वडापाव साठीची टिक्की ही डीप फ्रीझरमध्ये (Freezer) पाच – सहा दिवस ठेवली जाते आणि मग तीच टिक्की ग्राहकांना वडापाव तयार करून दिली जाते. अर्थात ग्राहकांना शिळा वडापाव दिला जातो.
चाकरमान्यांना धावपळीच्या कारणाने जेवणासाठी पुरेसा वेळ नसतो. त्यामुळे कमी कालावधीत पोटाला दिलासा देणारा पदार्थ म्हणून वडापावकडे पाहिले जाते.
मुंबईमध्ये (Mumbai) वडापाव मोठ्या प्रमाणात चालतो. तसाच तो नाशिकमध्ये देखील मोठ्या प्रमाणात चालतो. आणि या वडापावच्या दुनियेय छोटू फ्रांचायजीने मोठे नाव कमावले. ही फ्रांचायजी लोकांच्या मोठ्या प्रमाणात पसंतीस उतरली.
या फ्रांचायजीने मात्र आपल्या ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. शिळे वडापाव आपल्या ग्राहकांना खाऊ घालण्याचं पातक त्यांनी केल्याचं सांगण्यात येत आहे. त्याच कारणास्तव छोटू च्या नाशिकमधील उत्तम नगर येथील फ्रांचायजीवर कारवाई करण्यात आली.
अन्न व औषध प्रशासन विभागाद्वारे इथे पंचनामा करण्यात येऊन इथले, वेगवेगळे सॅम्पल नेण्यात आले आहेत.
वडापाव सारख्या लोकांच्या आवडत्या पदार्थाबाबत असे घडणे, ही लोकांसाठी नक्कीच धक्कादायक बाब आहे. चाकरमाणे, विद्यार्थी, नागरिक असे सारेच वडापाव अतिशय आवडीने खातात. त्यात छोटूच्या वडापावला ग्राहकांची मोठी पसंती होती. मात्र या नव्या खुलाश्याने सर्वांना धक्काच बसला आहे.
नाशिकमध्ये वडापाव विकणारे आज अनेक दुकान आहेत. जिथे ग्राहकांची मोठी गर्दी असते. लोक मोठ्या आवडीने वडापाव खातात. म्हणून अशा खवय्यांसाठी ही खरच धक्कादायक बाब आहे.
छोटू वडापाव हा ग्राहकांना अतिशय कमी दरात वडापाव उपलब्ध करून देत होता. ज्या कारणाने इथे ग्राहकांची मोठी रेलचेल असते. कमी दर आणि चव या कारणाने लोक मोठ्या प्रमाणावर छोटू वडापाव कडे आकर्षित होतात. मात्र हा धक्कादायक खुलासा झाल्यानंतर छोटू वडापाव कडे आता ग्राहक येण्याची शक्यता नाहीच.
आरोग्य हा मनुष्याच्या जीवनाचा अतिशय महत्वपूर्ण प्रश्न आहे. आणि उत्तम आरोग्यासाठी चांगले अन्न गरजेचे आहे. मात्र छोटू वडापावने ग्राहकांना आपल्या या कृत्यातून धक्काच दिला आहे.
आता सर्व तपासणी नंतर खरे काय आणि खोटे काय हे लवकरच निष्पन्न होईल.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम
नव्याने सुरू झालेल्या छोटू वडापाव ला पहिले एक छान अशी स्वाद होता.आता छोटू टेस्ट मध्ये भंगार झाला.
[…] ‘छोटू’ वडापाव खाताय, तर सावध व्हा! […]