द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : नाशिक जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींची मुदत संपली आहे. यात देवळा तालुक्यातील १३ ग्रामपंचायतींची मुदत नुकतीच संपली आहे.
मात्र या ग्रामपंचायतीवर प्रशासकांची नेमणूक करण्यात आली आहे. यामुळे सदर ग्रामपंचायत सदस्य होऊ घातलेल्या देवळा व उमराणे बाजार समितीच्या निवडणूकिती मतदानापासून वंचित राहणार आहेत. या कारणाने मतदान येथे होणार नसल्याने शासनाने याची दखल घेऊन त्यांना मतदानाचा अधिकार देण्यात यावा अशी मागणी शिवसेनेचे देवळा तालुका विभाग प्रमुख विजय जगताप यांनी केली आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीकरीता ग्रामपंचायतीच्या सदस्यांचे मतदानाबाबत शासनाला अर्ज करण्यात आला आहे. या अर्जात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुक प्रक्रिया चालु केलेली आहे. परंतु नाशिक जिल्ह्यातील ४०% ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणुन शासनाचे प्रतिनिधी नेमण्यात आलेले आहेत. तेथील कुठल्याही ग्रामपंचायत सदस्यांना निवडणुक प्रकियेत सहभागी अथवा मतदान देण्याचा अधिकार दिसत नाही. तरी याबाबत शासनाचे स्पष्ट आदेश निर्गमीत व्हावेत व सहा महिन्यापूर्वीचे ग्रामपंचायत सदस्यांना मतदार म्हणुन अधिकार देण्यात यावा किंवा शासन नियमान नसेल तर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीस स्थगिती देण्यात यावी, तोपर्यंत प्रशासक नेमण्यात यावे ही विनंती करण्यात आली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम