गुरुकुल पिठावर आरोप करणाऱ्यांवर देवळ्यात निषेध ; सेवेकऱ्यांचे पोलीस ठाण्यात निवेदन

0
15
येथील श्री स्वामी समर्थ केंद्रातील सेवेकऱ्यांच्या वतीने पोलीस उपनिरीक्षक विक्रांत कचरे यांना निवेदन देतांना रवींद्र येवला, दशरथ शेवाळे, कांतीलाल देशमुख, बापू गांगुर्डे आदी (छाया -सोमनाथ जगताप )

देवळा : अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुकुल पीठ त्रंबकेश्वरचे प्रमुख गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे व गुरुकुल पिठाचे सदस्य यांचेवर ट्रस्टच्या व्यवहारात अफरातफर केल्याचा आरोप अमर पाटील (धुळे) व चंद्रकांत पाठक (त्र्यंबकेश्वर) यांनी केल्याच्या निषेधार्थ येथील स्वामी समर्थ केंद्रातील सेवेकऱ्यांनने निषेध नोंदवत या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात यावा , अशी मागणी करण्यात आली. तशा आशयाचे निवेदन शुक्रवार (दि.२०) रोजी देवळा पोलीस ठाण्यात देण्यात आले. यावेळी सेवेकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते .

येथील श्री स्वामी समर्थ केंद्रातील सेवेकऱ्यांच्या वतीने पोलीस उपनिरीक्षक विक्रांत कचरे यांना निवेदन देतांना रवींद्र येवला, दशरथ शेवाळे, कांतीलाल देशमुख, बापू गांगुर्डे आदी (छाया -सोमनाथ जगताप )

निवेदनाचा आशय असा की, गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी पन्नास कोटींहून अधिक अपहार केल्याची तक्रार अमर पाटील व चंद्रकांत व पाठक या दोघांनी पोलिसात दाखल केली होती. मात्र त्यावर धर्मदाय आयुक्त यांनी संस्था स्थापनेपासून सर्व ऑडिट केले असता यात कुठलाही गैरव्यवहार नसून सर्व काही कायदा व नियमानुसार दिसून आले आहे व त्यांनी तसे जाहीरही केले आहे. मात्र अमर पाटील व चंद्रकांत जाधव यांनी बिनबुडाचे आरोप केल्यामुळे श्री स्वामी समर्थ सेवेकरी परिवाराच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.

उगीचच मीडियाला खोटी माहिती देऊन बदनामीचे मोठे षड्यंत्र रचण्यात आले . त्यामुळे लाखोंच्या पटीत असलेले सेवेकरी परिवार आता रस्त्यावर उतरत आहे. तरी या दोघांनावर त्वरित कारवाई करण्यात येऊन अटक करण्यात यावी अशी मागणी येथील श्री स्वामी समर्थ केंद्रातील सेवेकऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे .

निवेदनावर रवींद्र येवला, दशरथ शेवाळे, कांतीलाल देशमुख, बापू गांगुर्डे, आनंदा वाघ, पराग पवार, केदा आहेर, विजय शिंदे ,संगीता आहेर, चित्रा चव्हाण, सरला मांडोळे, सुलोचना शिंदे, उमा कांबळे, जिजाबाई देवरे, कविता मेतकर, कल्पना येवला, लिलाबाई धामणे, आशा आहेर, लताबाई मांडगे, माधवी आहेर, दिनकर मेतकर, नलिनी मेतकर, चंद्रकांत खैरनार, भास्कर आहेर, किशोर आहेर, सिताराम खैरनार, योगेश येवला, भिका बोरसे आदींच्या सह्या आहेत .


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here