द पॉईंट नाऊ ब्युरो : अमरावती येथील बडनेरा मधील युवतीच्या गुप्तांगातून Swab घेण्याचे कृत्य करणाऱ्या आरोपीला अखेर शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
अमरावतीमध्ये अलकेश देशमुख या आरोपीने दीड वर्षांपूर्वी मोदी ट्रामा केअर सेंटरमध्ये युवतीच्या गुप्तांगातून Swab घेण्याचे घृणास्पद कृत्य केले होते. ही युवती कोरोना चाचणी करण्यासाठी आली होती. मात्र या आरोपीने अतिशय घृणास्पद कृत्य केले. ज्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभर उमटले होते. अखेर या प्रकरणाचा एक निश्चित असा निकाल लागला.
अमरावती जिल्हा न्यायालयाने या आरोपीस या घृणास्पद कृत्यासाठी 10 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. बुधवारी न्यायालयाने हा निर्णय दिला.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम