गांजा झाला ‘ऑनलाइन’ ; अमेझॉन वर दोन टन ‘गांज्याची’ विक्री

0
16

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; मध्ये प्रदेशमध्ये अमेझॉन अँप वर ऑनलाइन गांजा विकण्याचा फंडा वापरण्यात आला आहे. यात दोन जणांना अटक करण्यात आली आहे. ऑनलाइन माध्यमातून दोन टन गांजा पकडण्यात आला असून. विशाखा पट्टणम मधून हा गांजा मध्येप्रदेश मध्ये विकला जात असतांना यंत्रनेच्या लक्षात आले आहे.

देशात ऑनलाइन कुठल्याही वस्तू मागवू शकतो, मात्र आता या ऑनलाइन खरेदी ला ग्रहण लागले आहे, कारण यामध्ये आता अमली पदार्थ देखील मिळत असल्याचे समोर आले आहे. यामुळे प्रशासन देखील अवाक झाले आहे.

देशात सध्या ऑनलाइन फसवणूक व अमली पदार्थ मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. देशात इतकी तस्करी कसकाय होतेय यंत्रणा गंडवले जातेय का ? नेमक कोणाच्या आशीर्वादाने ही तस्करी सुरू हे शोधन यंत्रणेसमोर आव्हान आहे.


हे ही वाचा……

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी  ; अमली पदार्थ हा विषय सध्या मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे. त्यात नुकतेच जळगाव येथे 1500 किलो गांजा आणि गुजरात मध्ये 120 किलो ड्रग्ज जप्त झाल्याचं वृत्त आहे.

सध्याच्या या घडीला सध्या अमली पदार्थांचं जाळं मोठ्या प्रमाणावर पसरू लागल्याचं दिसत आहे.

ज्यात नुकतेच घडलेले अभिनेता शाहरुख खान चा मुलगा आर्यन खान चे प्रकरण असेल अथवा मग सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात बाहेर निघालेला अमली पदार्थांचा विषय.

मागील 2 वर्षांत अमली पदार्थ प्रकरणे मोठ्या प्रमाणावर बाहेर आल्याने, अमली पदार्थांच्या जाळ्या संदर्भात पोलीस प्रशासन अनभिज्ञ कसे? असा सवाल उपस्थित होतोय.

अमली पदार्थांचे पेव मोठ्या प्रमाणावर सिने सृष्टीत फुटल्याचे दिसून आले. अर्थात, सिने सृष्टीतील अनेक संबंधितांना या संदर्भातील कारवाईस सामोरे जावे लागले.

ड्रग्ज सारखा विषय सिने सृष्टीत अगदी सहजरित्या चघळला जाताना दिसून येत आहे. सिने सृष्टीतील कलावंत आणि इतर मंडळींना या विषयात इतका रस कसा आणि का? हा प्रश्न यामुळे निर्माण होत आहे.

गुजरात मध्ये सुमारे 600 कोटींचे 120 किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले. यात चार जणांना अटक करण्यात आल्यानंतर, याचं कनेक्शन थेट पाकिस्तान मध्ये असल्याचं बोललं जातंय.

पाकिस्तानातून भारतात हे ड्रग्ज येतेच कसे? सुरक्षा व्यवस्था याबाबत अनभिज्ञ कशी? असे प्रश्न निर्माण होत आहेत.

तर जळगाव येथे सुमारे 1500 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. आंध्र प्रदेश इथून हा गांजा जळगाव मार्गे महाराष्ट्रात विक्री साठी आल्याचं बोललं जात आहे.

एन. सी. बी. द्वारे सध्या मोठ्या प्रमाणावर कारवाईचा बडगा उगारला जाऊन, मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ प्रकरणे समोर येत आहेत.

जळगाव मध्ये एरंडोल येथे ही कारवाई करण्यात येऊन 1500 किलो गांजा जप्त करण्यात आला…….

संरक्षण यंत्रणेच्या नाकावर टिच्चून अमली पदार्थ तस्करीचा प्रयत्न https://thepointnow.in/?p=2757

https://chat.whatsapp.com/D2yKDtyBmeW2S01C6AMqMa

 


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here