द पॉईंट नाऊ ब्युरो : नाशिक जिल्ह्यात वाढत्या कोविड रुग्णांच्या पार्श्वभूमीवर सर्व खुली पर्यटन स्थळे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
नाशिक जिल्ह्यात कोविड रुग्णांची संख्या पुन्हा दिवसागणिक वाढू लागली आहे. त्यात पर्यटन स्थळांवर गर्दी मात्र कमी होत नव्हती. वारंवार आवाहन करून देखील नागरिक ऐकायला तयार नसल्याने, अखेरीस जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता कोणालाही पर्यटन स्थळांना भेट देता येणार नाही.
जोपर्यंत शासनाचा पुढील आदेश येत नाही, तोपर्यंत सर्व पर्यटन स्थळे बंद राहतील. पर्यटन स्थळांवर कोणी आढळल्यास त्यांवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिले आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम