कोठुरे लसीकरण केंद्रावर ग्रामस्थांचा उदंड प्रतिसाद ; ५९३ लसीकरण

0
12

निफाड प्रतिनिधी (भूषण चोभे) : कोठुरे येथील लसीकरण केंद्रावर दि.३०रोजी महिना अखेर जरी असला तरी कोरोनाची राज्यात तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात असताना राज्य सरकारकडून (state govermemt) लसीकरण मोहिमेवर भर दिला जात आहे.

खबरदारी व आरोग्याच्या सुरक्षितीच्या दृष्टीने लस प्रभावी उपाय असल्याने लसीकरण जलदगतीने केले जात असल्याने व मागील काही आठवड्यापासून तुटवडा असल्याने काही उपकेंद्रवर लशी उपलब्ध नव्हत्या त्यामुळे तालुक्यातील अनेक लसीकरण केंद्रांवर लसीकरण ठप्प झाले होते परंतु जिल्हा रुग्णालयातुन काही आरोग्यउपकेंद्र तसेच तालुका केंद्रांना लशी उपलब्ध झाल्याने आरोग्य यंत्रणा पुनःच सज्या झाली व नागरिकांना मध्ये लशी बद्दलची मानसिकता सकारात्मक झाल्याने ५९३ ग्रामस्थांनी लशीचा लाभ घेताला.

लसीकरनासाठी कोठुरे ग्रामपंचायतिच्या वतीने सकाळी ७ वाजेपासून टोकण उपलब्ध करून दिलेले व सकाळी १०च्या सुमारास लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली लसीकरण जलदगतीने झाले.यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ वैभव पाटील, डॉ गौरव कुलकर्णी डॉ पूजा कापसे, डॉ अपूर्वा शिरसाठ, डॉ सतीश केदार आरोग्य सेवक डॉ दिलीप बोदडे, प्रदीप पवार,गजानन जयतकर, रत्नाकर भोये, आरोग्य सेविका श्रीमती नीलम पाटील, शिंदे, आरती मोरे, मयुरी गायकवाड, गटप्रवर्तक मनीषा खैरनार, माधुरी बर्वे, आशासेविका वैशाली मुळे, मुक्ता कडलग, कल्पना कहाळे, मनीषा मोगल, माया शेलार, आसमा खान, कोडिराम बनकर, निलेश कोरडे व ग्रामपंचायत कर्मचारी बाळासाहेब आहेर, जयश्री पवार, तसेच पोलीस कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले तसेच ग्रामस्थांनी लसीकरण मोहिमेला उदंड प्रतिसाद दिला


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here