द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; कोकणगाव ता.निफाड येथील तालुक्यातील अग्रगण्य माणली जाणारी कोकणगाव वि.का.सह.संस्था या संस्थेची सन २०२१/२२करीता सभासद वार्षिक सभा कोरोना साथीच्या प्रादुर्भावामुळे संस्थेच्या कार्यालयात दि.१८/०९/२०२१ रोजी संस्थेचे सर्व कार्यक्षम संचालक व कर्मचारी यांनी योग्य ते नियोजन करून ऑनलाईन पद्धतीने पार पाडली.
संस्थेच्या अध्यक्षस्तानी संस्थेचे विद्यमान अध्यक्ष श्री.प्रशांत दिनकर मोरे हे होते.तसेच संस्थेचे उपाध्याक्ष श्री.दशरथ (शरद) गायकवाड यांनी संस्थे बद्दल माहिती दिली तर संस्थेचे सचिव यांनी संस्थेच्या विषयाचे व अहवालाचे वाचन केले व संस्थे बद्दल माहिती दिली की, संस्थेचे ३१/०३/२०२१ अखेर भागभांडवल ७४.९३ लाख असून संस्थेने चालू आर्थिक वर्षात जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून सन २०२१.२२ या आर्थिक वर्षा करीता संस्थेच्या सभासदाना ३३१.५० लाख इतके कर्ज वाटप केले.
संस्थेची दिनांक ३०/०६/२०२१ अखेर ५३ सभासदांकडे १५०.५५ लाख थकीत आहेत. संस्थेचा एकूण नफा १७.३२ लाख आहेत. तर संस्थेच्या ठेवी व गुंवणूक ह्या १२३.२० लाख आहेत. संस्थेचे अध्यक्ष श्री प्रशांत मोरे यांनी संस्थे बद्दल अनुक्रमे माहिती दिली की या आर्थिक वर्षात संस्था नफ्यात असून नफ्याचे योग्य ते नियोजन करून संस्थेच्या सभासदाना लाभांश वाटप करण्यात येईल तसेच या कोरोनाच्या काळात सुद्धा वसुलीचे योग्य ते नियोजन करून व संस्थेच्या सभासदांचे वसुली साठी खूप मोठे योगदान असल्याने संस्था नफ्यात आहेत असे मत मांडले. सभेचे सूत्र संचालन संस्थेचे संचालक प्रा,संजय गायकवाड यांनी केले तर जिल्हा बँकचे उपस्थित असलेले मा.बँक निरीक्षक श्रीराम कोरडे व शाखाधिकारी बाळकृष्ण साळवे साहेब यांनी केलेल्या संस्थेला सहकार्या बद्दल संस्थेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला या वेळी सभादांच्या विविध समस्या सोडविन्यासाठी संस्थेचे संचालक मंडळ कटीबध्द असल्याचे संस्थेचे संचालक माणिकराव सरोदे यांनी सांगितले तसेच या वेळी उपस्थित संस्थेचे संचालक मंडळ ,भाऊसाहेब मोरे , वाळु मोरे, शशंकरराव गायखे, गोविंद मोरे , संजय लोकणार, मधुकर गरुड, शिरीष गायकवाड, शोभाताई मोरे , ताराबाई गायकवाड यांनी सभासदांच्या प्रश्नाना योग्य ती उत्तरे देवून समाधान केले.तसेच वसुलीसाठी सर्व थकबाकीदार सभासदांनी सहकार्य करावे असे मत मांडले,
यावेळी उपस्थित मान्यवर केशव मोरे, सुभाष गायकवाड , दिगंबर बर्वे ,रज्जाक सैय्यद ,भास्कर मोरे, अन्न्नासाहेब मोरे, यांनी विविध समस्यांवर आप आपले मत मांडून चर्चेत सहभाग घेतला,तसेच संस्थेच्या चांगल्या कामा बद्दल संस्थेचे संचालक बँक अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन केले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम