कुऱ्हाडीने सपासप वार करून सावकाराची निर्घृण हत्या

0
7

द पॉईंट नाऊ ब्युरो : नांदेड येथे बिल्डरची गोळ्या घालून हत्या केल्याची घटना ताजी असतांनाच आता पुण्यात एका खाजगी सावकाराची निर्घृण हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे.

पुण्यमधील हडपसर येथे धुवराज जाधव असे नाव असलेल्या सावकाराची गणेश खरात या आरोपीने कुऱ्हाडीने वार करत निर्घृण हत्या केली आहे. गणेश खरात याने धुवराज जाधव याच्याकडून कर्ज घेतलेले होते. ते पैसे परत करण्यासाठी जाधव याने गणेश खरातकडे तगादा लावला होता. त्यात जाधव याने गणेश खरात याच्या बायकोला शिवीगाळ केली. याच रागातून गणेश खरातने धुवराज जाधव याची कुऱ्हाडीने वार करून हत्या केली.

हडपसर येथे घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे. पुण्यात मागील काही दिवसांत अत्याचार, चोरी, हत्या या घटनांनी पुण्याला हादरून सोडले आहे. दरम्यान पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here