कसबे सुकेणेसह पंचक्रोशीतील एचएएल वसाहतीतील रस्ता खुला करा

0
20

ओझर प्रतिनिधी : कोरोणा महामारी व सुरक्षेचे निमित्त देत एच ए एल प्रशासनाने हायवे १ नंबर गेट ते मारीमता गेट गेल्या दोन वर्षांपासून बंद केले आहे. त्यामुळे कसबे सुकेणे व पंचक्रोशीतील दिक्षी, दात्याने, जिव्हाळे, थेरगाव, ओणे, मौजे सुकेणे, कसबे सुकेणे, भाऊसाहेब नगर, पिंपळस आदी गावातील भाजीपाला उत्पादक शेतकरी नागरिक, शालेय विद्यार्थी, नोकरदार यांना बाजारपेठेत जाण्याकरिता ओझर गावातून ये जा करावी लागते ,ओझर गावातील रस्ते अरुंद असल्याने असल्याने शेतमाल वाहतूक करताना वाहतूक कोंडी निर्माण होते ,शेतकऱ्यांना व नागरिकांना अनंत अडचणीचा सामना करावा लागतो.

त्यामुळे या पंचक्रोशीतील नागरीकांनी वेळोवेळी संबंधित एच ए एल कंपनीच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिली पण यावर कुठलाही तोडगा निघाला नाही हे बघून संबंधित गावातील ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच सदस्य यांनी निफाडचे आमदार दिलीपराव बनकर यांना निवेदन दिले त्या निवेदनानुसार त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या अध्यक्षतेखाली व आमदार दिलीपराव बनकर यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच एच ए एल प्रसासन उपविभागीय अधिकारी निफाड ,डॉ अर्चना पठारे तहसीलदार शरद घोरपडे व .संबंधित गावचे सरपंच उपसरपंच यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत जिल्हाधिकारी यांनी सविस्तर माहिती जाणून घेत रस्ताची वहिवाट हा नागरिकांचा नैसर्गिक अधिकार असून तो हिरावून घेता येत नाही.

त्यामुळे एच ए एल प्राशासनाने सदरचा रस्ता तातडीने खुला करावा अन्यथा मामलेदाराच्या विशेष कायद्याअंतर्गत कारवाई करून रस्ता खुला करण्यात येईल. यासंबंधी उपविभागीय अधिकारी व तहसीलदार निफाड यांनी तत्काळ कारवाई करून लवकरात लवकर हा विषय मार्गी लावावा अश्या सूचना जिल्हाधिकारी मांढरे यांनी दिल्या या प्रसंगी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे ,नाशिक शहर काँग्रेसचे शहर अध्यक्ष शरद आहे ,पंचायत समिती सदस्य बंडू आहेर पिंपळसचे सरपंच तानाजी पूरकर, उपसरपंच विलास मत्सगर कसबे सुकेना उपसरपंच धनंजय भंडारे मौजे सुकेना सरपंच सचिन मोगल , ओणेचे सरपंच संदीप कातकडे, उपसरपंच शांताराम नीसाळ, थेरगावचे सरपंच दत्तू बोराडे ,उपसरपंच वंदना काळे,जिव्हाळे सरपंच किशोर पागेरे ,दात्याने उपसरपंच सुनील पवार दिक्षीचे सरपंच देविदास चौधरी, नंदू सांगळे ,भूषण धनवटे,रावसाहेब चौधरी आदी उपस्थित होते

 


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here